शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Crime News राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 5:59 PM

लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

ठळक मुद्देकोविडसंदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गुन्हे दाखलसर्वाधिक गुन्हे पुणे शहरातसर्वात कमी अकोलामध्ये

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२ हजार १६१ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १८ हजार २१६ व्यक्तींना अटक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.ही माहिती मुंबईतील पोलीस विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात झाली असून, १४ हजार ७५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक कमी सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोल्यामध्ये असून, त्याची संख्या ७२ आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार २५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ५१ हजार ८७४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७५ घटनांची नोंद झाली असून, यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडीCrime Newsगुन्हेगारी