खेड येथे ७० जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, तरुण ताब्यात; रत्नागिरी पाेलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:36 IST2026-01-30T14:36:04+5:302026-01-30T14:36:27+5:30

शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याचा पाेलिसांनी व्यक्त केला संशय

70 live village bombs seized in Khed youth in custody Ratnagiri Police has started investigation | खेड येथे ७० जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, तरुण ताब्यात; रत्नागिरी पाेलिसांकडून तपास सुरु

खेड येथे ७० जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, तरुण ताब्यात; रत्नागिरी पाेलिसांकडून तपास सुरु

रत्नागिरी : खेड-मंडणगड रस्त्यावर गस्तीदरम्यान एका तरुणाला जिवंत गावठी बाॅम्बसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने माैजे मुगीज (ता. खेड) येथे बुधवारी (दि.२८) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. प्रकाश राम जगताप (वय ३३, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलिस स्थानक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या आहेत. खेड-मंडणगड रस्त्यावर बुधवारी सायंकाळी गस्त घालताना प्रकाश जगताप याच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यामुळे त्याला पाेलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे ७० जिवंत गावठी बाॅम्ब सापडले. या बाॅम्बसह चारचाकी गाडी असा एकूण २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रकाश जगताप याला ताब्यात घेऊन दापोली पोलिस स्थानकात भारतीय स्फोटक कायदा १९०८ कलम ५ तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, सत्यजित दरेकर, चालक अतुल कांबळे यांनी केली.

शिकारीसाठी वापर?

पाेलिसांनी जप्त केलेले बाॅम्ब शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे बाॅम्ब संशयिताने स्वत: तयार केले आहेत की अन्य काेणाकडून घेतले आहेत, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलिस स्थानकात अथवा डायल ११२ या संपर्क क्रमांकावर कळवावी. - नितीन बगाटे, पाेलिस अधीक्षक

Web Title : खेड़ में 70 जीवित बम जब्त, युवक हिरासत में; जांच जारी

Web Summary : रत्नागिरी पुलिस ने खेड़ में 70 जीवित बम जब्त किए, एक युवक हिरासत में। गश्त के दौरान प्रकाश जगताप नामक संदिग्ध विस्फोटक के साथ मिला। पुलिस को शिकार के लिए बम होने का संदेह है, जांच जारी है। मामला दर्ज।

Web Title : 70 Live Bombs Seized in Khed, Youth Detained; Investigation On

Web Summary : Ratnagiri police seized 70 live bombs and detained a youth in Khed. The suspect, Prakash Jagtap, was found with the explosives during patrolling. Police suspect the bombs were for hunting and are investigating their origin. A case has been registered.