शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण बँक निवडणुकीसाठी ३० अर्ज

By admin | Updated: May 14, 2015 23:58 IST

राजकारणाला ऊत : अनेक जुन्या संचालकांचे रिंगणात उडी, बिनविरोध विजयासाठी प्रयत्न

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेसाठी १४ जून रोजी निवडणूक होत असून, आज (गुरुवारी) दिवसभरात सहाय्यक निबंधक कार्यालयात ३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष संजय रेडीज व त्यांच्या जुन्या अनेक सहकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयात आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी दापोलीचे सहाय्यक निबंधक आर. के. बांगर यांच्या उपस्थितीत एकूण ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये विद्यमान चेअरमन संजय रेडीज, व्हाईस चेअरमन मोहन मिरगल, संचालक अनिल दाभोळकर, सतीश खेडेकर, अ‍ॅड. दिलीप दळी, मंगेश तांबे, निहार गुढेकर, राधिका पाथरे यांचा समावेश आहे. याशिवाय सहकार पॅनलमधून नीलेश भुरण, प्रशांत शिरगावकर, अजय खातू, समीर जानवलकर यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. सहकार पॅनेलच्या दोन जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. सहकार पॅनेल हे सर्वपक्षीय पॅनेल करुन बँकेचा कारभार एकमुखी करण्याचा सहकार पॅनेलच्या प्रमुखांचा निर्धार आहे. याशिवाय इम्तियाज परकार, समीर टाकळे, सुनील टेरवकर - सर्वसाधारण, सुनील टेरवकर - इतर मागास, प्रशांत शिरगावकर, प्रशांत शिरगावकर - इतर मागास, संजय रेडीज - इतर मागास, संजय रेडीज - सर्वसाधारण, अनिल दाभोळकर, दिलीप दळी, सतीश खेडेकर, सचिन बाईत - सर्वसाधारण, सचिन बाईत - विमुक्त भटकी जमात, चंद्रकांत बाईत - विमुक्त भटकी जमात, चंद्रकांत बाईत - सर्वसाधारण, रहिमान दलवाई, मंगेश तांबे, निहार गुढेकर, समीर जानवलकर - अनुसूचित जाती जमात, मोहन मिरगल - सर्वसाधारण, मोहन मिरगल - विमुक्त भटकी जमात, राधिका पाथरे - महिला, नीलेश भुरण - विमुक्त भटकी जमात, नीलेश भुरण - सर्वसाधारण, दीपक विखारे, राजन कुडाळकर, राजेश केळसकर - सर्वसाधारण, प्रवीण तांबट - इतर मागासवर्ग, राजेश केळसकर - विमुक्त भटकी जमात, धनंजय खातू यांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बांगर यांना प्रियांका माने सहाय्य करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सहकार पॅनेलच्या उमेदवारांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)माजी चेअरमन सुचय रेडीज, माजी आमदार बापू खेडेकर, अध्यक्ष संजय रेडीज यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनेल १५ जागांसाठी कार्यरत आहे. विद्यमान संचालकांतून छाया खातू, विलास चिपळूणकर, राजन कुडाळकर, दीपक विखारे, उमेश काटकर, भालचंद्र बिर्जे व सुचय रेडीज हे रिंगणाबाहेर असतील. सुचय रेडीज यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे, तर मागच्या निवडणुकीत निहार गुढेकर व मंगेश तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांना सहकार पॅनलमध्ये संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून एक महिला व पुरुष संचालकाला संधी देण्यात येणार आहे. मुस्लिम उमेदवारालाही जागा देण्यात येणार आहे.चिपळूण मतदार संघात सर्वसाधारण १४ चिपळूण बाहेरील सर्वसाधारण मतदार संघात ५ भटक्या विमुक्त जाती ५ इतर मागासवर्ग ४ अनुसूचित जाती जमाती १ महिला राखीव १.अनेक जुन्या संचालकांचेही अर्ज दाखल.