शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली...! बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांचा फुटला बांध
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
4
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
5
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
6
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
7
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
8
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
9
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
10
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
11
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
12
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
13
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
14
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
15
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
16
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
17
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
19
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
20
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 

सावधान!, रत्नागिरी जिल्ह्यात १८ दिवसांत २२ अपघात, १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:07 IST

अर्धवट चौपदरीकरण, वाढलेला वेग कारणीभूत

रत्नागिरी : वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भरमसाट वाढ होऊ लागली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर तसेच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या अपुऱ्या कामामुळे तसेच वेगात वाहन हाकण्यामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. गेल्या १८ दिवसांत जिल्ह्यात महामार्ग आणि अंतर्गत मार्गांवर विविध ठिकाणी २२ अपघात झाले. या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३१ जण जखमी झाले आहेत.सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात, गोव्यात सुटीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, या दोन्ही महामार्गांवर अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहनचालकांना डोकेदुखी होत आहे. या मार्गांवरून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे अवघड वळणात वाहने कलंडण्याच्या घटना घडत असून, यातून जीवघेणे अपघात घडत आहेत.त्यातच आता रस्ते मोठे झाल्याने या मार्गावरून वेगाने वाहने हाकली जात आहेत. या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांत अधिकच भर पडत आहे. सध्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. १ मेपासून शाळांना सुटी पडल्याने चाकरमानीही मोठ्या प्रमाणावर कोकणातील गावाकडे परतू लागले आहेत. सध्या महिनाभर महामार्गावर गर्दी राहणार आहे.वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि अति वेगामुळे महामार्गांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवरही अपघात होऊ लागले आहेत. १ ते १८ मे या १८ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी २२ अपघात झाले. यात १२ जणांचा मृत्यू झाला. किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या १५ आहे तर गंभीर असलेल्यांची संख्या १६ आहे. मृतांमध्ये आता आणखी पाचजणांची दुर्दैवी भर पडली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू