Zodiac Sign, Horoscope 21 February 2021 | राशीभविष्य २१ फेब्रुवारी २०२१, अविवाहितांना विवाहयोग, उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल

राशीभविष्य २१ फेब्रुवारी २०२१, अविवाहितांना विवाहयोग, उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल

मेष - आज स्वतःचे खाजगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा असे श्रीगणेश सांगतात. घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल.  आणखी वाचा  

वृषभ - श्रीगणेश म्हणतात की आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.  आणखी वाचा  

मिथुन -  उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. तब्बेत चांगली राहणार नाही.  आणखी वाचा  

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. अविवाहितांना विवाहयोग आहेत. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आणखी वाचा 

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्‍यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल असे श्रीगणेश सांगतात. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील.  आणखी वाचा 

तूळ - कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा. तब्बेतीकडे लक्ष द्या.  आणखी वाचा  

वृश्चिक - आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. आणखी वाचा  

धनू - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण.  आणखी वाचा  

मकर - शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही.  आणखी वाचा 

कुंभ - स्वभावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना श्रीगणेश देतात. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या.  आणखी वाचा  

मीन - महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल.  आणखी वाचा 

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Zodiac Sign, Horoscope 21 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.