शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

आठवड्याचे राशीभविष्य - 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 10:19 AM

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

महिन्याचा हा दुसरा आठवडा आपणास अनुकूल आहे. मात्र, आठवड्यात आपणास थोडे सावध राहावे लागेल. नवीन कार्याची सुरुवात होऊ शकेल. आपण स्वतःसाठी बचतीचे पैसे खर्च कराल. आर्थिक भविष्य सुरक्षित होण्यासाठी एखादी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची योजना तयार करू शकाल. आपणास अपेक्षित असलेली कामे पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल. आपणास सतत जागरूक राहावे लागेल. स्थिर मनानेच आपण योग्य निर्णय घेऊ शकाल. आठवड्यात धनहानी व मानहानीची सुद्धा शक्यता असल्याने कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका... आणखी वाचा

वृषभ

आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक भागीदारीस हा आठवडा अनुकूल आहे. मात्र, व्यावसायिक गुप्त शत्रू व विरोधकांच्या कारवाया वाढतील. मित्रांकडून लाभ होईल व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. धनलाभ संभवतो. विचारात परीपक्वता येईल. कार्यक्षेत्री वरिष्ठांकडून लाभ होईल. पदोन्नती संभवते. व्यापाराची नवीन रूपरेषा तयार करू शकाल. वडिलधाऱ्यांकडून सुद्धा काही लाभ संभवतो. नोकरी - व्यवसाय व इतर क्षेत्रात सुद्धा आठवडा लाभदायी आहे. व्यावसायिक क्षेत्रात चांगल्या संधी लाभतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे... आणखी वाचा

मिथुन

आठवड्यात आपण उत्साहित राहाल. सरकारी व निम सरकारी कामात आपला फायदा होईल. व्यापार वृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नात यश प्राप्त होईल. नोकरीत नवीन उद्दिष्ट मिळू शकतील. हि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या अखेर पर्यंत आपण प्रयत्नशील राहाल. ह्या आठवड्यात प्राप्ती व खर्चचा समतोल साधला जाईल.  दरम्यान आपल्या पसंतीच्या वस्तू खरेदी करण्यात आपण व्यस्त राहाल. कुटुंबीय व मित्रांसह मौज - मजा करण्यात सुद्धा पैसा खर्च होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा निराशाजनक आहे. मित्रांसह बाहेर फिरण्यात पैसा खर्च होईल. आठवड्यात आपणास कौटुंबिक जीवनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा

कर्क

आठवडा आपणास मिश्र फलदायी आहे. यश प्राप्तीसाठी आपणास अधिक परिश्रम करावे लागतील. नोकरी - व्यवसायात स्पर्धा जाणवेल. मानसिक गुंता झाल्याने महत्वाचे निर्णय आपण घेऊ शकणार नाही. सुरवातीस नवीन कार्यात अपेक्षित यश मिळू शकणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना परिश्रम वाढवावे लागतील. आठवड्यात वाणी संयमित ठेवावी लागेल, अन्यथा कुटुंबात एखादा वाद निर्माण होईल. दरम्यान आपली संवेदनशीलता वाढेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल... आणखी वाचा

सिंह 

आठवडा आपणास अनुकूल आहे. एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करण्यास आठवडा अनुकूल आहे. सरकारी कामात लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात व्यावसायिक लाभ होतील. व्यवसायात नवीन गिर्हाईके मिळतील. नवीन संस्थांशी संबंध येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे पूर्ण जोमाने पूर्णत्वास नेऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा मिळेल. आठवड्यात संपत्तीशी संबंधित निर्णय न घेणे हितावह राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिल्यासच त्यांना यश मिळू शकेल... आणखी वाचा

कन्या

आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला आहे. सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित एखादे काम कराल. आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. आपणास झुकणे आवडत नसल्याने आपल्या कामाच्या आड येणाऱ्यांचा आपण विरोध कराल. कामाचा व्याप वाढला तरी त्याने घाबरून जाण्या ऐवजी नियोजनबद्ध काम करून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यास आपण प्रेरित व्हाल. आठवड्याच्या मध्यास आपणास असे वाटेल कि आपले सर्व प्रयत्न चुकीच्या दिशेने होत आहेत, अशा वेळेस कोणतेही काम विचारपूर्वक करावे. आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही... आणखी वाचा

तूळ

आठवडा मिश्र फलदायी आहे. दरम्यान आपणास सावध राहून वाटचाल करावी लागेल. परंतु आठवड्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. नवीन काम करण्यास आपण प्रेरित व्हाल. आपण एखाद्या नवीन नोकरी किंवा व्यवसायासाठी सुद्धा तयारी करू शकाल. आपणास नोकरी - व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारावे लागेल. व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कामा निमित्त एखादा प्रवास संभवतो. आठवड्यात अपार कष्ट करून सुद्धा आपणास यश न मिळाल्याने आपले मन उदास होईल. विचारपूर्वक आपले काम करावे. हा आठवडा स्थायी संपत्ती संबंधित निर्णय घेण्यास अनुकूल नाही... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. एखादी दीर्घकालीन आर्थिक योजना आपण तयार करू शकाल. व्यावसायिक व्यक्ती आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. आयात - निर्यातीशी संबंधित व्यापारी व नोकरदार मंडळींना यश मिळेल. मात्र, आठवड्याच्या मध्यास कोणत्याही नवीन कामाची सुरवात करू नये. सरकारी व निम सरकारी कार्यात यश प्राप्त होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. कामाचा वाढता व्याप पाहून आपण पळ काढणार नाही. रागाच्या भरात कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

धनु 

आठवडा आपणास अनुकूल आहे. कामात इच्छित यश प्राप्ती होईल. नवीन कामाच्या सुरवातीस आवश्यक असलेला उत्साह व जोश राहील. मात्र, अतिउत्साह किंवा अभिमान बाळगू नका. आठवड्यात खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. मातुलाकडून लाभ संभवतो. एखादी सुखद बातमी मिळेल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. प्रत्येक गोष्टीकडे वास्तविक दृष्टिकोन ठेवून आपण बघाल. व्यापारात अपेक्षित यश आपणास मिळेल. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सकारात्मकतेचा आहे. प्रियजनांचा सहवास रोमांचकारी ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे... आणखी वाचा

मकर

आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण ध्येय प्राप्तीसाठी योग्य दिशेने मार्गक्रमण कराल. आठवड्याच्या सुरवातीस आपले व्यवहार आपणास जपून करावे लागतील. नोकरीत सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यापारात आपणास फायदा झाला तरी सुद्धा भागीदार किंवा अन्य अनुभवी लोकांवर विश्वास ठेवून पुढील वाटचाल करावी लागेल. सरकारी कामात आपण यशस्वी होऊ शकाल.  आठवड्यात खर्च वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. एखाद्या अनावश्यक कामावर पैसा खर्च करून आपण उदास व्हाल. स्थायी संपत्तीशी संबंधित गोष्टी सध्या स्थगित ठेवाव्यात... आणखी वाचा

कुंभ

आठवड्यात आपणास खूप काम करावे लागेल. व्यापारातील एखाद्या नवीन प्रकल्पाच्या सुरवातीसाठी आपली व्यस्तता वाढेल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. कार्यालयात सुद्धा आपणास एखादे नवीन काम मिळू शकेल. सरकारी व बिनसरकारी कामात आपणास इतरांची मदत मिळेल. ह्या आठवड्यात आपण सढळ हस्ते खर्च कराल. कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी खर्च कराल. घराचे सुशोभीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च कराल. वाहन खरेदीचा विचार करू शकाल... आणखी वाचा 

मीन 

आठवड्याची सुरुवात चांगली होईल. नोकरीत एखादा नवीन प्रकल्प आपणास मिळण्याची शक्यता आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपण कराल. व्यापार वृद्धीची आपली योजना उत्तमच असेल. आपणास लगेच यश मात्र मिळू शकणार नाही. यशस्वी होण्यासाठी आपणास कष्ट वाढवावे लागतील. स्पर्धात्मक वातावरणात आपला निभाव लागण्यासाठी आपणास नवीन काही शिकावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी व व्यापारात भागीदाराशी वाद घालू नये. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होऊ शकणार नाही. त्यांच्या मनात विविध प्रकारचे विचार थैमान घालतील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष