Today's horoscope - September 20, 2020 | आजचे राशीभविष्य -२० सप्टेंबर २०२०, संसारात सुख- शांती राहील, सरकारी कामात यश मिळेल

आजचे राशीभविष्य -२० सप्टेंबर २०२०, संसारात सुख- शांती राहील, सरकारी कामात यश मिळेल

मेष -   श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. लक्ष्मीची कृपा जाणवेल. परिवार आणि दाम्पत्यजीवन यात सुख संतोष अनुभवाल. वाहन सुख मिळेल.  आणखी वाचा 

वृषभ -  शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून ठरलेली सगळी कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज तब्येतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली वार्ता समजेल. आणखी वाचा 

मिथून -   नवीन कामाच्या आरंभाला चांगला दिवस नाही. जीवनसाथी व संतती यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या असे श्रीगणेशजी सांगतात. चर्चा किंवा वादविवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश म्हणतात की आज तुमच्यात आनंद आणि स्फूर्ती यांचा अभाव असेल. मन खिन्न असेल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल.  आणखी वाचा 

सिंह -  आजचा दिवस आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्याबरोबर लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल.  आणखी वाचा 

कन्या -  कुटुंबात सुखशांती व कौटुंबिक आनंद यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे जेवण मिळेल. आणखी वाचा 

तूळ -  श्रीगणेश म्हणतात की आज तुमची रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल त्यामुळे कामे सफल बनतील. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक -  आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर व काम यांवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो.  आणखी वाचा 

धनु -  आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. संसारात सुख- शांती राहील. प्रिय व्यक्तींची भेट संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. आणखी वाचा 

मकर -  आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आणखी वाचा 

कुंभ - शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यांच्या नाराजीला बळी पडाल. आणखी वाचा 

मीन -  तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजातही प्रतिकूलता जाणवेल. घरातील लोकांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

English summary :
Today's horoscope, Zodiac Sign, Astrology - September 20, 2020

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - September 20, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.