Todays horoscope 16 January 2021 | राशीभविष्य- 16 जानेवारी 2021: सिंह राशीच्या व्यक्ती नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडतील

राशीभविष्य- 16 जानेवारी 2021: सिंह राशीच्या व्यक्ती नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडतील

मेष - सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. आणखी वाचा.

मिथुन - प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडाल. आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेश सांगतात की मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील व्यक्तीशी भांडण होईल. आणखी वाचा.

सिंह - पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याचे योग श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा.

कन्या - शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा मिळेल. आणखी वाचा.

तूळ - आज मुलांची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मनाला तजेलदारपणाचा अनुभव येईल. अतिविचारामुळे मन विचलित होईल. आज एखाद्यासोबत बौद्धिक चर्चा किंवा वाद-विवाद झाल्यास त्यात फार खोलवर न जाण्याचा सल्ला गणेशजी देतात.

वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबातील सदस्य, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आणखी वाचा.

धनु - गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर- सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा.

कुंभ - शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आणखी वाचा.

मीन - आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. मित्र- स्वकीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays horoscope 16 January 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.