आजचे राशीभविष्य - 13 मे 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:42 AM2020-05-13T06:42:35+5:302020-05-13T06:43:10+5:30

जाणून घ्या, कसा जाईल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - 13 May 2020 pnm | आजचे राशीभविष्य - 13 मे 2020

आजचे राशीभविष्य - 13 मे 2020

Next

मेष - घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणइ मित्र आपणाला घेरून टाकतील.  आणखी वाचा

वृषभ  - व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या वार्ता आपणाला भावविवश बनवतील. आणखी वाचा

मिथुन - अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. आणखी वाचा

कन्या- चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. आणखी वाचा

तूळ- श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा

वृश्चिक- कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. आणखी वाचा

धनु- द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मकर - ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. आणखी वाचा

कुंभ - कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 13 May 2020 pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.