शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२४, मान - प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 07:24 IST

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष -  आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. आणखी वाचा वृषभ - आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान - प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. आणखी वाचा 

मिथुन  - आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. आणखी वाचा 

कर्क  - आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या - पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा 

सिंह - आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टी पासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावे. आणखी वाचा 

कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल.  आणखी वाचा

तूळ  -  आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद - विवाद व चर्चेत पडू नका. आणखी वाचा 

वृश्चिक - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्या विषयी जपून राहावे. आणखी वाचा

धनु -  आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभ संभवतो. आणखी वाचा 

मकर - आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर - सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी उदभवतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा

कुंभ -  आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.  आणखी वाचा

मीन - आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र - स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल.  आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य