शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:03 IST

बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे."

ब्रिटिश इतिहासकारांच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे, भारतीय इतिहासात अनेक चुकीच्या गोष्टी नोंदवल्या गेल्या. यात जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या लग्नाच्या कहाणीचाही समावेश आहे. एवढेच नाही तर, अकबरनाम्यात जोधा-अकबर लग्नाचा कसलाही उल्लेख नाही, असा दावाही राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. ते बुधवारी सायंकाळी उदयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्तकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे. भारमल नावाचा एक राजा होता आणि त्याने एका दासीकन्येचे लग्न अकबराशी लावून दिले होते."

बागडे पुढे म्हणाले, "इंग्रजांनी आपल्या नायकांचा इतिहास विकृत केला. त्यांनी तो इतिहास व्यवस्थित लिहिला नाही आणि सुरुवातीला त्यांनी लिहिलेला इतिहास खरा मानला गेला. मात्र नंतर, काही भारतीयांनी इतिहास लिहिला, पण तरीही त्यावर ब्रिटिशांचा प्रभाव होता."

'महाराणा प्रतापांसंदर्भात कमी शिकवलं जातं...'यावेळी राज्यपाल बागडे यांनी, राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला तहासाठी पत्र लिहिले होते, या एतिहासिक दाव्यांचेही खंडण केले. हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेही ते म्हणाले. तसेच, "महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल अधिक आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते," असेही बागडे म्हणाले.

तथापि, "आता परिस्थिती सुधारत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपून भविष्यातील आव्हानांसाठी नवीन पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असेही बागडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajasthanराजस्थानEducationशिक्षण