२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:29 IST2024-11-30T16:29:10+5:302024-11-30T16:29:28+5:30
Rajasthan News: राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे.

२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड
राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे. टीकमसिंह राव यांच्या या कंपनीवर अवैध वाहतुकीचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाच्या शोधमोहिमेमध्ये टीकमसिंह राव यांच्या घरामधून ४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे १८ कोटी रुपये किमतीचं २० किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. त्याशिवाय गोल्डन अँड लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीबाबत कागदपत्रंही सापडली आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सपोर्ट व्यापारी टीकमसिंह राव यांच्या कंपनीकडून बेकायदेशीर मालवाहतुकीची तक्रार मिळाली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मिळालेली माहिती खरी असल्याते समोर आले. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये धाडी टाकल्या.
गुजरातमध्ये दोन ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी, बांसवाडा येथे तीन ठिकाणी, जयपूरमध्ये विश्वकर्मा इंडस्ट्रियल एरियामध्ये एक आणि उदयपूरमध्ये १९ ठिकाणी पथकांकडून शोधमोहिम सुरू आहे. प्राप्तिकर विभाागाचे जयपूर येथील मुख्य संचालक अवधेश कुमार यांच्या सुचननेनुसार ही करावाई २८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुरू झाली होती. ती अजूनही सुरू आहे. कंपनीच्या उदयपूर, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबईसह एकूणन २३ ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली.
मागच्या शुक्रवारी ट्रान्सपोर्ट व्यावयासिक टीकमसिंह यांच्या उदयपूर येथील १९ वेगवेगळ्या ठिकाणांची झडती घेण्यात आली होती. यादरम्यान, २५ किलो सोनं सापडलं. त्याची बाजारामधील किंमत सुमारे १८ कोटी ३४ लाख एवढी असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय येथे कोट्यवधी रुपयांची रोख रक्कमही सापडली आहे. तसेच अनेक लॉकरचीही तपासणी करण्यात येत आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.