शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण रायगडसाठी माणगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:10 IST

नागरिकांनी व्यक्त केले समाधान : अलिबागपर्यंतची पायपीट वाचणार

माणगाव : येथे उपजिल्हा न्यायालय यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अलिबाग येथे जाण्यासाठी होणारी पायपीट वाचली आहे. आता दक्षिण रायगडमध्ये माणगाव या मध्यवर्ती ठिकाणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायाधिकरण न्यायालय लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पक्षकार, वकील व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दक्षिण रायगडमधील ८ तालुक्यांकरिता जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायाधिकरण माणगाव येथे सुरू करण्याकरिता खा. सुनील तटकरे यांनी नुकतीच सुतारवाडी (ता. रोहा) येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत या न्यायाधिकरणाला संमती मिळाली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाºयांचे न्यायिक प्रकारणांमधील सुनावणीकरिता महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, पाली या ८ विभागांअंतर्गत येणाºया माणगाव, श्रीवर्धन, रोहा व महाड येथील ४ उपविभागीय अधिकाºयांच्या निर्णयाविरुद्ध होणाºया अपिलाचे कामकाज माणगाव येथे घेण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी भारत शितोळे यांना खा. तटकरे यांनी आदेश दिले.

जिल्ह्यात औद्योगिकीकरण आणि विकास प्रकल्प होत आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात भूसंपादन करून शेतकºयांना दुप्पट, चौपट जमिनीचे दर देत आहेत. त्यातील सुमारे ९० टक्के लोकांना आर्थिक मोबदला मिळाला आहे. मात्र कौटुंबिक, भावकी, गावकी व वैयक्तिक वाद असल्याने ही प्रकरणे आर्थिक लाभासाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे सुनावणीसाठी येत असतात. त्यामध्ये ९० ते ९५ टक्के निकाल प्रांताधिकारी देत असतात. त्यात बहुतेकांचे समाधान होऊन आर्थिक वाद मिटत असतात. मात्र काही जणांना हा निकाल मान्य नसल्यामुळे ते अलिबाग येथे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जात होते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा नाहक खर्च होत होता. आता माणगाव येथेच न्यायिक प्रकरणांची सुनावणी होणार आहे.पाठपुराव्याला यशमाणगाव येथेच न्यायिक प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने न्यायदान लवकर होईल अशी आशा व्यक्त होत आहे. यासाठी माणगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मानकर व ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विनोद घायाळ यांनी पाठपुरावा केला होता. बैठकीला माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे, अ‍ॅड. राजीव साबळे आदी उपस्थित होते.