शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

फुलपाखरांचे अनोखे पर्यावरण रक्षण; दुर्मीळ फुलपाखरांची असोसिएशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 23:37 IST

पश्चिम घाटाच्या प्रदेशामध्ये जैवविविधता असल्याने, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाडचे विस्तीर्ण जंगल, माथेरानचे जंगल आणि कर्जतचा डोंगराळ भाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी फुलपाखरांची विविधता दिसून येते.

- आविष्कार देसाईरायगड : फुलपाखरांच्या विशिष्ट प्रजातीचे उत्तम असे असोसिएशन असते. या प्रजातींना विशिष्ट प्रकारचे रंग, फुले आणि फुलातील मध आकर्षित करतात. त्यामुळे अशा फुलपाखरांकडून परागकणांची नैसर्गिक प्रक्रिया राखली जाते. त्यामुळे निसर्गातील नामशेष होणाºया वनस्पतींसह ही फुलपाखरे स्वत:च्या प्रजातीचे एक प्रकारे रक्षण करून पर्यावरणातील समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. पश्चिम घाटाच्या प्रदेशामध्ये जैवविविधता असल्याने, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाडचे विस्तीर्ण जंगल, माथेरानचे जंगल आणि कर्जतचा डोंगराळ भाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी फुलपाखरांची विविधता दिसून येते. त्याचप्रमाणे, रायगड जिल्ह्यामध्ये फुलपाखरांच्या काही फार दुर्मीळ प्रजाती आढळून आल्या आहेत, असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे. सामान्यत: रायगडातील वनसंपदेमध्ये विविध प्रजातींच्या सुमारे १४७ जाती आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेट एगफ्लाय, रथिंडा आमोर (वानर कोडे), युप्लॉईया कोर (सामान्य क्रा)े, कॉमन मॉर्मन, कॉमन लियोपार्ड- (सामान्य बिबट्या), कॉमन पियरोट अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश आहे. फुलपाखराची कविता आपण लहानपणी ऐकली आहे आणि आजही ती गुणगुण असतो. फुलपाखारांचे मनोहरी रंग त्यांचा आकार, विविध रंगीबेरंगी फुलांवरून त्यांचे बागडणे आजही सर्वांच्याच मनाला प्रफुल्लित करतात. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि विशेष करून मानवी जीवनाच्या उद्धारासाठी फुलपाखरांचे जतन होणे गरजेचे आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीसारख्या अन्य संस्था प्रयत्न करत आहेत.अलिबाग तालुक्यातील तीनवीरा बटरफ्लाय झोनअलिबाग तालुक्यातील तीनवीरा धरण हे ठिकाण निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले ठिकाण आहे. चारही बाजूला विस्तीर्ण जंगल मधोमध तिनवीरा धरण, त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी जशी पर्वणी, त्याचप्रमाणे पशू-पक्षी यांच्यासाठीही स्वच्छंदतेचे ठिकाण. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेतमार्फत बटरफ्लाय झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. जगभरातील, तसेच तेथील पर्यावरणाशी एकरूप होणाºया विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पर्यटकांचा राबता अधिक असतो. त्यांच्यासाठी असा बटरफ्लाय झोन उभारल्याने स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.कोणत्या प्रजातींना जिल्ह्यातकशामुळे धोका आहेजिल्ह्यात वाढत्या उद्योगांमुळे पर्यावरणात मोठ्या संख्येने प्रदूषण करण्यात येत आहे. मानवी जीवनासाठी हे घातक आहे. त्याचप्रमाणे, इको सिस्टीम सुरळीत चालवणाºया फुलपाखरांच्या अस्तित्वासाठीही धोकादायक आहे. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती या तग धरून आहेत. त्यांचे अस्तित्व नामशेष झाल्यास निसर्गाचीही अपरिमीत हानी होणार आहे. त्यामुळे निसर्गातील प्रत्येक घटकांचे अस्तित्व जपणे, त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात फुलपाखरे आढळणारी ठिकाणेउद्योगांमुळे रायगड जिल्ह्याची निसर्ग संपन्नतेची ओळख पुसली जात असल्याची भीती आहे. या परिस्थिती आपले अस्तित्व टिकून ठेवणाºया कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाडचे विस्तीर्ण जंगल, माथेरानचे जंगल आणि कर्जतचा डोंगराळ भाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी फुलपाखरांची विविधता दिसून येते.विशिष्ट प्रजातींच्या फुलपाखरांची असोसिएशन असते. ही फुलपाखरे ठरावीकच फुले, रंग आणि मध याकडे आकर्षित होतात. त्यामुळे ्त्यांच्याकडून परागकणाची नैसर्गिक प्रक्रिया राबवली जाते. दुर्मीळ होत असणाºया फुलपाखरांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यावरणाला हानी पोहोचेल.- प्रा. डॉ. अनिल पाटील(पर्यावरण तज्ज्ञ)जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये १४७ प्रजातींची फुलपाखरे आढळतात. निसर्गाचे संतुलन राखण्यास फुलपाखरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून फुलपाखरांच्या प्रजातींचा अभ्यास केला जात आहे, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी होणारे प्रयत्न वाढविण्याची गरज आहे.- अद्वैत घाटपांडे(पर्यावरण प्रेमी)

टॅग्स :Raigadरायगडenvironmentपर्यावरण