शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत हातगाड्या, पथारीवाल्यांनो सावधान!

By admin | Updated: May 12, 2017 01:54 IST

नगरपरिषद हद्दीत बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत लागणाऱ्या हातगाड्या, रिक्षा, दुकानासमोर लागणारी

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : नगरपरिषद हद्दीत बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत लागणाऱ्या हातगाड्या, रिक्षा, दुकानासमोर लागणारी दुकानदारांच्या वस्तू, अनधिकृत लागणारी रस्त्यावरील वाहने, दुकानासमोर माल खाली करणारे ट्रक व गाड्या अशा अनेक कारणांमुळे कर्जत शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे व नगरपरिषद संयुक्त कारवाई करणार त्यामुळे वाहन चालक, अनधिकृत हातगाड्या, पथारीवाल्यांनो सावध राहा, ही कारवाई शुक्रवारपासून होणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.शहरातील वाहतूक प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी कर्जत नगरपरिषद आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी प्रास्ताविकात वाहतुकीच्या नियमांचे सर्वसामान्य जनतेने पालन केले तर वाहतुकीची समस्या भेडसावणार नाही असे सांगितले. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मी कर्जत पोलीस ठाण्यात नव्याने आले आहे, एक महिन्याच्या कालावधीत एक गोष्ट निदर्शनास आली. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमाचे पालन होत नाही त्यामुळे कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत दुकानदार सामान बाहेर ठेवत आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथारीवाले बसत आहेत, हातगाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या असतात, मुख्यबाजारपेठेत काही गाड्या कायमस्वरूपी उभ्या आहेत, मोटारसायकल कशाही उभ्या केल्या जात आहेत यामुळेच कर्जत शहरात वाहतुकीची समस्या जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणून कर्जत नगरपरिषद धडक कारवाई करणार आहे आणि त्यांना या कारवाईसाठी जे पोलिसांचे सहकार्य लागेल ते देण्यात येईल असे सांगून शहरातील काही रस्ते एकमार्ग करण्यात येणार आहे. तसेच कर्जतमध्ये शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात गाड्यांना प्रवेश नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, उपनगराध्यक्षा अर्चना बैलमारे, विरोधी पक्षनेत्या यमू विचारे, नगरसेविका सुवर्णा जोशी आदींसह प्रशांत उगले, नंदू पोथरकर रिक्षाचालक, नागरिक उपस्थित होते.