शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या उत्पन्नवाढीसाठी विचार करा

By admin | Updated: April 14, 2017 03:17 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये ४३ कोटी ८७ लाख तीन हजार रुपयांचा सन १७-१८ चा मूळ अर्थसंकल्प आणि ७८ कोटी ३२ लाख ७५ हजार रुपयांचा

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये ४३ कोटी ८७ लाख तीन हजार रुपयांचा सन १७-१८ चा मूळ अर्थसंकल्प आणि ७८ कोटी ३२ लाख ७५ हजार रुपयांचा २०१६-१७ चा अंतिम अर्थसंकल्प सभागृहात अवलोकनार्थ ठेवण्यात आला. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्याने जिल्हा परिषदेचा सुमारे ६० टक्के महसूल बुडाला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी अन्य पर्यायाचा तातडीने विचार करावा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सदस्यांनी लावून धरली.सत्ताधाऱ्यांकडून विविध विषय समितींच्या सभापती, सदस्य यांच्या निवडी केल्या नव्हत्या. नियमानुसार मार्च महिन्याच्या २७ तारखेपर्यंत अर्थसंकल्प तयार करून तो सरकारकडे मंजुरीला सादर करणे बंधनकारक असते. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करून तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. गुरु वारी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये तो सभागृहाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला. गुरुवारी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची अर्थ व बांधकाम सभापतीपदी निवड झाली. शिक्षण व आरोग्य सभापतीपदी नरेश पाटील, तर डी.बी.पाटील यांची कृषी व दुग्ध व्यवसाय समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सभागृहात जाहीर केले. विषय समितींच्या सदस्यपदीही सत्ताधारी सदस्यांचीच सर्वाधिक वर्णी लागली.कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाने सहा कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असला, तरी टँकरने पाणीपुरवठा करण्यावर निर्बंध येत आहेत. पेण आणि पोलादपूरसह अन्य तालुक्यांचा भाग हा अत्यंत दुर्गम आहे. टँकरसाठी जीपीएस प्रणाली यंत्रणा आवश्यक आहे, मात्र या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे टँकर त्या भागात जातो की नाही हे समजू शकत नाही. त्यामुळे टँकर जरी पोचला तरी सरकारी नियमानुसार जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून तो पोचला नसल्याचे अधोरेखित होते. त्यामुळे तेथे टँकर पुरवठा होत नाही. पर्यायाने तेथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. दुर्गम भागासाठी जीपीएस यंत्रणेचा निकष बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी मागणी शेकापच्या अ‍ॅड. नीलिमा पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांनी केली. (प्रतिनिधी)पंचायत समितीच्या शेष फंडातून खर्च पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून टँकरसाठी खर्च करावा. जिल्हा परिषदही त्यातील काही प्रमाणात खर्च उचलेल, असे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी सुचविले.पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आरोग्य आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. विकास निधीमध्ये समान संधी राहील, असे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सांगितले.समाज कल्याण विभागासाठी गेल्या अर्थसंकल्पात तब्बल २९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. आताच्या अर्थसंकल्पात फक्त आठ कोटींचे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती गीता जाधव यांनी केली.जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोकळ््या जागेत व्यापारी गाळे, पार्किंग उभारावे, तसेच मालमत्ता आहेत त्या भाड्याने द्याव्यात. जेणेकरून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल, अशी मागणी शेकापचे सदस्य सुरेश खैरे यांनी केली.