शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षकांची

By admin | Updated: September 5, 2015 22:59 IST

राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र

रोहा : राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र त्यासाठी शिक्षकांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणचा दर्जा उंचावण्याची गरज आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रभावापुढे निभाव लागण्याकरता शिक्षकांनाच पुढाकार घ्यावा लागेल असेही तटकरे यांनी रोहा येथे सांगितले.रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रोह्याच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात आमदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिशद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार सुभाष पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शिक्षण सभापती भाई पाशिलकर, अर्थ सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत ओसवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.सुनील तटकरे यांनी म्हणाले, गावाचा मान पूर्वी हा त्या ठिकाणच्या केंद्र शाळेमुळे होता. आता या शाळांमधील पट कमी होत चालल्याने या शाळांचे महत्व कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली. आमदार जयंत पाटील यांनी, सन्मानित झालेल्या शिक्षकांनी डॉ. चिंतामणराव देशमुखांच्या भूमीत सन्मान झाल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगुन जिल्ह्यासह राज्यातील दीड लाख शिक्षक पुढील वर्षी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावला तरच अस्तित्व टिकवता येईल याचे भान ठेवण्याचे आवाहन केले.शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक आदर्श शिक्षकांसह जिल्ह्यात शालांत परिक्षांमध्ये प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आय.एस.ओ. मानांकम प्राप्त केलेल्या शाळांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.$$्निजनता विद्यालयात कार्यक्रमरसायनी : जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज प्रत्यक्ष करुन अध्यापनाची अनुभूती घेतली. अध्यापन, सभा, भाषणे, सूत्रसंचालन सर्व काही विद्यार्थ्यांनी केले. सभेमध्ये प्रथम डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रीफळ विद्यार्थ्यांनीच वाढविले.