शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मिनीट्रेन सुरू करण्यासाठी कामाला गती

By admin | Updated: May 13, 2017 01:05 IST

लागोपाठ दोन दिवस नॅरोगेज रु ळावरून खाली घसरल्याने ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली मिनीट्रेन पुन्हा रुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : लागोपाठ दोन दिवस नॅरोगेज रु ळावरून खाली घसरल्याने ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली मिनीट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिनीट्रेनच्या २१ किलोमीटरच्या नॅरोगेज मार्गावर मिनीट्रेनला आणि पर्यटकांना सुरक्षित प्रवास घडविण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीची आणि नवीन कामे सुरू केली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा रु ळावर आणण्यासाठी रेल्वेकडून सुरु असलेल्या प्रयत्नामुळे मिनीट्रेन पुन्हा रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शंभर वर्षांचा इतिहास असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन गतवर्षी मे महिन्यात एकाच ठिकाणी लागोपाठ दोन दिवस रु ळावर खाली घसरली. त्यावेळी मिनीट्रेनचे प्रवासी डबे रु ळावर खाली पडून झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, परंतु मिनीट्रेनला झालेला अपघात यामुळे थेट रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवली.त्यानंतर मागील सहा महिने या मिनीट्रेनच्या मार्गाची दैनंदिन दुरु स्ती करण्याकडे मध्य रेल्वेने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. शंभर वर्षे विनाअडथळा सुरू असलेली आणि जगातील वारसासाठी नामांकन झालेली मिनीट्रेन पुन्हा सुरु व्हावी यासाठी दबाव वाढल्याने जानेवारी २०१७ मध्ये मध्य रेल्वेने मिनीट्रेन पुन्हा सुरु करून तिला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल असे जाहीर केले होते. त्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनसाठी तीन नवीन इंजिने बनवून घेतली आहेत. मुंबई कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनवून नेरळ येथे पाठविली आहेत. त्यामुळे मिनीट्रेन पुन्हा सुरु होण्याबाबत काहीसा दिलासा पर्यटक आणि या गाडीवर अवलंबून असलेल्या माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला मिळाला आहे.त्यानुसार मिनीट्रेनचा नॅरोगेज मार्ग पर्यटक प्रवासी यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित करण्याचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. मिनीट्रेनच्या २१ किलोमीटरच्या नॅरोगेज मार्गात ज्या ठिकाणी खोल दरीसारखा भाग आहे, तसेच ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत अशा ठिकाणी मिनीट्रेनचे इंजिन रु ळावरून खाली घसरले तरी प्रवाशांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी दगडी संरक्षण भिंती उभारण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार लोखंडी तारांमध्ये दगड बांधण्याची कामे केली जात आहेत, त्या गॅबियनची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २१ किलोमीटरच्या एकूण नॅरोगेज मार्गात तब्बल ६०० मीटर भागात सिमेंटच्या साहायाने संरक्षण भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व कामांसाठी ६ कोटी रु पयांची तरतूद रेल्वेने केली आहे. तर मिनीट्रेन वर्षभर बंद असल्याने या ट्रॅकवर दुरु स्तीची कामे बंद ठेवली होती. ती सर्व कामे मध्य रेल्वेच्या आयडब्लूआय विभागाकडून सुरु असून शंभरहून अधिक कामगार ती कामे करीत असताना संरक्षण भिंतीची कामे ठेकेदारामार्फत करण्यात येत आहेत. नॅरोगेज रु ळाच्या आजूबाजूला आणि ट्रॅकच्यामध्ये माती आणून टाकली जात आहेत. ही सर्व कामे सध्या ज्या गतीने सुरु आहेत, ते पाहता रेल्वे प्रशासन मिनीट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेने मिनीट्रेन नॅरोगेज ट्रॅकवर आणण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न या केवळ माहितीने माथेरानचा पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येतील असा माथेरानमधील व्यावसायिकांंना विश्वास आहे.