शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

सोहमचा विक्रमी जलतरण प्रवास

By admin | Updated: December 27, 2016 02:36 IST

कणे गावचा छोटा बालवीर सोहम पाटील या दहा वर्षांच्या मुलाने मोरा-उरण ते गेटवे आॅफ इंडिया हे १६ किमी नॉटीकल अंतर पोहून अवघ्या ३ तास १६ मिनिटांत यशस्वीरीत्या पार

पेण : कणे गावचा छोटा बालवीर सोहम पाटील या दहा वर्षांच्या मुलाने मोरा-उरण ते गेटवे आॅफ इंडिया हे १६ किमी नॉटीकल अंतर पोहून अवघ्या ३ तास १६ मिनिटांत यशस्वीरीत्या पार केले. यावरून तो भविष्यात उत्तम जलतरणपटू होणार याची प्रचिती आणून दिली. कणे गावातील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा भविष्यात उत्तम स्वीमर बनणार याबद्दल सर्वांचीच खात्री पटल्याने कणे ग्रामस्थ मंडळी, पाटील कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बुधवारी २१ डिसेंबर रोजी मोरा-उरण येथून सकाळी ७ वाजता सोहमने समुद्रात उडी घेवून गेटवेच्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली. सडपातळ देहयष्टी व लहान वयाची तमा न बाळगता प्रवास सुरु के ला.उद्दिष्टाप्रत जाण्याची जिद्द व मेहनत याची पहिली परीक्षा अथांग समुद्राच्या भव्यतेवर पोहणारा हा बालवीर आपला स्टॅमिना तसूभर ही कमी होऊ न देता पोहत राहिला. मैल, दोन मैल, पाच मैल, दहा मैल व अंतिम टप्पा अशा ध्येयाप्रती जात अखेर कापले. उद्दिष्ट साध्य करून सोहमने १० वाजून १६ मिनिटांनी गेटवे गाठून आपल्या पहिल्या सागरी जलतरण प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. कणे मित्र मंडळ परिवाराचा सदस्य असलेल्या हा छोटा मित्र अखेर आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. गेटवे आॅफ इंडिया मुंबई येथे त्यांचे खास अभिनंदन करण्यासाठी पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा परिषद सदस्य कौशल्या पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका ममता लांगी पाटील, काँग्रेस युवा नेते ललित पाटील, प्रशिक्षक सविन शिंगरूत आदी उपस्थित होते.या जलतरण प्रवासात सोहमला सहायक स्वीमर म्हणून श्रवण ठाकूर, सिद्धेश धनावडे, हिमांशू मलबारी, प्रितेश करडे, ऋषिकेश कालन, जनीन शिंगरून आणि स्वराली म्हात्रे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)