शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

सेफ्टीझोन सर्व्हेसाठी कंपन्यांचा शोध

By admin | Updated: July 30, 2015 00:13 IST

नौदलाच्या आरक्षित सेफ्टीझोन परिसराच्या जागेची मोजणी हवाई सर्वेक्षणाव्दारे करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे महसूल विभागाने संबंधित कामासाठी

उरण : नौदलाच्या आरक्षित सेफ्टीझोन परिसराच्या जागेची मोजणी हवाई सर्वेक्षणाव्दारे करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे महसूल विभागाने संबंधित कामासाठी सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांचा शोध घेण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र या हवाई सर्वेक्षणाच्या कामासाठी लागणारा खर्च कोण करणार याची चिंता महसूल अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे.उरण तालुक्यातील केगाव, म्हातवली आणि शहरातील बोरी-पाखाडी महसुली गावांच्या हद्दीतील ५४९ सर्व्हेनंतर मधील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेकडो हेक्टर शेतजमिनी नौदलाने सेफ्टीझोनसाठी १६ मे १९९२ साली आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी आवश्यक असलेली जमीन नौदलाने ताब्यात घेतली, तर उर्वरित जमिनी नौदलाने संपादन केल्या नसल्याने २२ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ताब्यातच आहेत. या जमिनींवर शेतकऱ्यांनी गरजेनुसार घरे बांधली आहेत. केगाव, म्हातवली आणि शहरातील बोरी-पाखाडी महसुली गावांतील आरक्षित सेफ्टीझोनमधील घरांची संख्या साडेचार ते पाच हजारपर्यंत आहे. सेफ्टीझोनमधील आरक्षित जागा-जमिनी खरेदी करण्याचा सपाटा काही बिल्डर्सलॉबीने लावला होता. गरीब गरजूंच्या फसवणुकीला आळा बसावा या हेतूने २००९ साली माजी नगराध्यक्ष नगराजशेठ यांनी सेफ्टीझोनमधील ठरावीक जागा ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर निर्णय देताना उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचे हित आणि हक्कांना बाधा पोहचणार नाही याची दक्षता घेऊन ३१ डिसेंबर २०११ पर्यंत कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईचे आदेश देऊन मागील चार वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. (वार्ताहर)