शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

वन्य जीवांच्या संरक्षणासाठी प्राणिमित्र केरळला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:12 IST

महाडमधील सात जणांचा चमू; इडुक्की अभयारण्यात हानी

महाड : केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये आपला अधिवास हरवून बसलेल्या वन्य प्राण्यांच्या विशेषत: सापांच्या संरक्षणासाठी महाड येथील सात प्राणिमित्रांचा एक चमू मंगळवारी केरळकडे रवाना झाला. केरळला गेलेले हे प्राणिमित्र आउल्स आणि सिस्केप या संस्थांचे सदस्य आहेत. केरळमधील एका संस्थेने या दोन संस्थांशी संपर्क साधून या कार्यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती.केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणहानी आणि मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहेच, त्याचप्रमाणे इडुक्की जिल्ह्यात असलेल्या इडुक्की अभयारण्याचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अभयारण्यातील अधिवास नष्ट झाल्याने विविध प्राणी आणि साप हे नागरी वस्तीमध्ये येऊ लागले असून त्यामुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांनाही धोका निर्माण झाला आहे. सध्या केरळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्यात वाइल्ड लाइफ क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सहभाग कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच तेथील जोस लुईस यांनी सिस्केप आणि आउल्सकडे प्राणिमित्रांची मदत मागितली होती.त्यानुसार या दोन्ही संस्थांचे सदस्य चिंतन वैष्णव, चिराग मेहता, प्रणव कुलकर्णी, योगेश गुरव, नितीन कदम, ओंकार वरणकर (सर्व महाड) कुणाल साळुंखे (अलिबाग) हे सात जण आज केरळकडे रवाना झाले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर