प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:14 IST2025-05-14T13:12:51+5:302025-05-14T13:14:43+5:30
Raigad Crime news: दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
Raigad Murder News:रायगड जिल्ह्यातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची कोयत्याचे वार करुन निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉ. कल्पेश ओसवाल यांच्या राजेश पॉलीक्लिनिक अँड नर्सिंग होममध्ये मंगळवारी(13 मे) सांयकाळी हा प्रकार घडला. मयत तरुणी याच ठिकाणी नर्स म्हणून कामाला होती.
प्राथमिक माहितीनुसार, पोर्णिमा अनंत देसाई, (रा. देसाईपाडा, ता. सुधागड) हिचे शेखर संतोष दुधाणे (रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड) याच्याशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे तरुणाने पौर्णिमाम हल्ला केल्याचे समजते. आरोपी शेअकरने कोयत्याने प्रेयसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सपासप वार केले, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवले.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, तिथे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणीचा अन् गळफास घेतलेला तरुणाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. ही हत्या प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पाली पोलिस ठाण्याअंतर्गत घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरुन गेला आहे.