शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या कामात घोळ

By admin | Updated: April 16, 2017 04:36 IST

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी

- संदीप जाधव, महाड

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी चक्क शेतातील मातीचा वापर केला जात आहे. या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. पुलाच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आलेला मातीचा भराव सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका असून त्या ठिकाणी सावित्री पूल दुर्घटनेसारखीच दुसरी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महामार्गावर महाडजवळील सावित्री नदीवरील पूल गेल्यावर्षी २ आॅगस्ट रोजी रात्री कोसळून दोन एसटी बससह एक तवेरा जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेलीहोती. यादुर्घटनेत ४० प्रवाशांचे बळी गेले होते. महाराष्ट्रातही या घटनेमुळे हाहाकार माजला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडून नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महामार्ग विभागाचा प्रयत्न असला, तरी पुलाच्या दोन्ही बाजूंकडून उभारण्यात आलेल्या आरसीसी संरक्षक भिंतीच्या आत ३० फुटांहून अधिक उंचीचा भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.भरावासाठी कठीण मुरु म व रबल सोलिंग ऐवजी शेतातील मातीचा हजारो ब्रासचा भराव टाकण्यात येत असल्याची बाब महामार्ग विभागाच्या अभियंत्याच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन निदर्शनास आणून दिली. पुलाच्या दोन्ही बाजूंकडे टाकण्यात येत असलेला हा भराव अतिवृष्टीत नदीच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचा धोका असल्याचेही माणिक जगताप यांनी या अभियंत्याच्या लक्षात आणून दिले. प्रत्यक्षात या पुलाच्या कामाच्या अंदाजपत्रकात कठीण मुरु म व रबल सोलिंगच्या भरावासाठी हा भराव करण्याचे स्पष्ट असतानाही, अत्यंत निकृष्ट दर्जाची माती या भरावासाठी वापरली जात असल्याने तसेच या मातीचेही बेकायदा उत्खनन व विनारॉयल्टी वापरली जात असल्याचा आरोपही माणिक जगताप यांनी यावेळी केला.‘ध्रुव’ संस्थेचे नियंत्रणच नाहीसावित्री नदीवर पुलाच्या बांधकामावर देखरेख व गुणवत्तेबाबत नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारने ध्रुव कन्सल्टन्सी या खासगी एजन्सीला दिलेले आहे. यासाठी ध्रुव कन्सल्टन्सीने देखरेखीसाठी सा. बां. विभागाच्या एका निवृत्त उपअभियंत्याची नेमणूक केली आहे. मात्र, पोलादपूर सा. बां. विभागात उपअभियंता म्हणून सेवाकाळात असताना या उपअभियंत्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या पुलाच्या कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत ध्रुव या एजन्सीचे कुठलेही नियंत्रणच नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पुलाचे काम टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडून केले जात आहे.