शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्यांची कर्जतच्या बाल उपचार केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:02 IST

मुलांना, पालकांना मार्गदर्शन; पोषण, स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना सूचना

कर्जत : तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य व महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या बाल उपचार केंद्रास कर्जतच्या प्रांताधिकारी यांच्यासह इतर शासकीय अधिकाºयांनी भेट देत वार्डामधील स्वच्छता व पोषणाबाबत सूचना दिल्या.कर्जत येथील दिशा केंद्राच्या पोषण हक्क गटाच्या वतीने जिल्हा तसेच राज्यस्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर व रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीपीडीसीमधून मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित मुलांसाठी बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या बाल उपचार केंद्रात एकूण १३ तीव्र कुपोषित मुले उपचार व पोषण सेवा घेत आहेत. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या केंद्रास समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी, शासकीय अधिकाºयांनी भेटी देत मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहीरराव, कर्जत-खालापूरच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे, संदीप पाटील आदीनी भेट देत मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले.प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता, आहार पुरवणाºया कर्मचाºयांना आहाराबाबत सूचना केल्या. मुलांच्या वजनवाढीबाबतची व मुलांची मेडिकल ग्रोथ कशी, याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडून घेतली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेत या बाबत मार्गदर्शन केले.बाल उपचार केंद्रासाठी आवश्यक तो निधी या पुढेही उपलब्ध करून दिला जाईल, याबाबत आश्वासित केले, तसेच तालुक्यात सुरू असलेल्या एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचाही निधी वेळेवर मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.- शशिकला आहीरराव, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकासजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार हे बाल उपचार केंद्र सुरू असून या केंद्रामधून बरे होऊन परत घरी गेलेल्या मुलांचाही पाठपुरावा करून त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी दिशा केंद्राच्या मदतीने व मोहीम स्वरूपात हे काम नियमित ठेवण्याचे नियोजन आहे. आरोग्य व बालविकास विभागासह सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने कु पोषणाची तीव्रता कमी करण्याचे नियोजन आहे.- वैशाली ठाकूर, rai

प्रांताधिकारी, कर्जत