तुपगाव येथील शाळेत निकृष्ट पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:22 PM2019-09-25T23:22:05+5:302019-09-25T23:22:10+5:30

अळ्या, किडे असल्याचे निदर्शनास; विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम

Poor nutrition at school in Tupgaon | तुपगाव येथील शाळेत निकृष्ट पोषण आहार

तुपगाव येथील शाळेत निकृष्ट पोषण आहार

Next

- राकेश खराडे 

मोहोपाडा : चौक परिसरातील तुपगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून या आहारामुळे काही विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन काही विद्यार्थ्यांना जुलाब व पोटदुखीचा त्रास होत आहे. तुपगाव ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर व तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव यांनी शालेय पोषण आहाराची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. तर जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांनी पाहणी करून हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना देऊ नये अशा सूचना केल्या.

तुपगाव जिल्हा परिषद शाळेतील अंकु शवाघे या विद्यार्थ्याला जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने त्याची आई सरिता वाघे हिने शाळेतून दिल्या जाणाºया जेवणाची तपासणी केली. त्यांना जेवणातील कडधान्यात लहान अळ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर यांना सांगितला. शिवाय शालेय शिक्षकांनाही याबाबत वाघे यांनी सांगितले होते. त्यानंतर ठोसर यांनी हा प्रकार गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना सांगितला होता.

तुपगाव ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते सोपान अपटेकर यांच्यासह ग्रामस्थांनी तुपगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत जावून पोषण आहाराची पाहणी केली.

अधिकाऱ्यांनी के ली पोषण आहाराची पाहणी
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहारात अळ्या, किडे लागल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख देविदास पाडवी, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी देखील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराची पाहणी केली.
काही आहाराची तारीख संपून २०१७, २०१८ सालची असल्याचे दिसून आले. यावेळी संबंधितांनी मुख्याध्यापिका मलबारी यांना विचारणा करून हा आहार विद्यार्थ्यांना देवू नये अशी सूचना करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी जबाबदार शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जेवणात अळ्या, किडे असतात यामुळे माझ्या मुलाला जुलाब व पोटदुखीचा त्रास झाला होता. याबाबत शिक्षकांना कळवले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.
- सरिता वाघे, विद्यार्थ्याची आई

तुपगाव रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया अन्नधान्याला कीड लागल्याचे तपासणीत दिसून आले. आम्ही याअगोदर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया धान्याची तपासणी करून द्यावे अशा सूचना केल्या आहेत.
- देविदास पाडवी, राजिप शाळा केंद्र प्रमुख

शालेय पोषण आहारात बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसे वरिष्ठांना कळवितो.
- भाऊसाहेब पोळ, गटशिक्षणाधिकारी, खालापूर

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराबाबत शिक्षकांना अनेकदा सांगण्यात आले, परंतु संबंधितांच्या निष्काळजीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो.
- विजय ठोसर, अध्यक्ष, स्वच्छता पोषण आहार कमिटी

Web Title: Poor nutrition at school in Tupgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.