शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पेणचे विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 04:07 IST

वरसईतील २८६ मुलांची पुन्हा तपासणी; २७ विद्यार्थ्यांना तापाची लागण; उपचारासाठी दाखल

पेण : पेण-वरसई येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील मुलांना तापाची लागण झाली आहे. शनिवारी अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तब्बल २८६ मुलांची आरोग्य तपासणी केली. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अलिबाग येथे सिव्हिल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप असल्याचे वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले.आश्रमशाळेतील १८ विद्यार्थ्यांना ताप, उलट्या, मळमळ आदीचा त्रास होऊ लागल्याने गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी पेणमधील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते, त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिरावल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या पथकाने २८६ मुलांची शनिवारी पुन्हा आरोग्य तपासणी केली. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे अशासकीय समिती अध्यक्ष संजय सावळा यांनी प्रशालेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छता व पोषण आहाराची पाहणी करून शाळेच्या मुख्याध्यापक बी. बी. निवडुंगे यांना सूचना दिल्या.परिस्थिती नियंत्रणात असून येथील कर्मचारी, शिक्षक व आदिवासी समाज पेण तालुका समितीचे अध्यक्ष जोमा दरवड, सचिव हरेष वीर सदस्य कृष्णा खाकर, पांडुरंग ठाकरे, लक्ष्मण निरगुडा हे आश्रमशाळा परिसरावर लक्ष ठेवून आहेत.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी सर्वस्तरांतून घेतली जात आहे. आश्रमशाळा परिसरात स्वच्छता राखण्याचे कठोर निर्देश प्रकल्प कार्यालयाने दिले आहेत.याशिवाय २७ विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत समाजाचे समिती सदस्य, जिल्हा सिव्हिलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी यांच्या सतत संपर्कात आहेत.परिस्थिती नियंत्रणात असूनही खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीअंती २७ विद्यार्थ्यांना हलविण्यात आले आहे.वातावरणात पाच हजारांपेक्षा अधिक व्हारस आढळतात, त्यापैकी नेमक्या कोणत्या व्हायरस मुळे हा ताप आला हे नेमके सांगता येत नाही.तीन दिवसांचा ताप हा व्हायरल ताप मानला जातो तर ८ ते १० दिवस राहिलेला ताप टायफॉइड मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेला ताप संसर्गजन्य (व्हायर) ताप असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी याच आश्रमशाळेतील १८ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य तापाची लागण झाल्याने प्रथम पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात तर त्यानंतर गुरुवारी येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.पेणमध्ये बालरोगतज्ज्ञ नाहीपेण उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने या सर्व मुलांना अलिबागला जिल्हा रुग्णालयात आणावे लागले आहे.दरम्यान, सर्व मुलांना एकदम ताप आला नाही. १५ दिवसांपूर्वी एक-दोन जणांना आला आणि मग तो ताप आम्हा सर्वांना आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.सर्वच आश्रमशाळांची तपासणी करापेण आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील कर्जत तालुक्यातील चाफेवाडी, डोंगरपाडा, भालीवडी, पिंगळस, पेण तालुक्यातील सावरसई, वरसई, वरवणे, पनवेल तालुक्यातील साई, माणगाव तालुक्यातील नांदवी आणि अलिबाग तालुक्यातील कोळघर या दहा शासकीय आदिवासी आश्रमशाळांची स्वच्छता, आरोग्य आणि विद्यार्थी आरोग्य विषयक तत्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कर्जतमध्ये आदिवासी क्षेत्रात सक्रि य कार्यरत दिशा केंद्र संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगम यांनी एक लेखी निवेदनाद्वारे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.पेण तालुक्यातील वरसई आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जरी हे लेखी निवेदन जंगले यांनी दिले असले, तरी गेल्या १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घेतलेल्या बैठकीत ही मागणी केली होती. त्या वेळी सहायक आदिवासी प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे यांना डॉ. सूर्यवंशी यांनी या अनुषंगाने तत्काळ आदेश दिले होते; परंतु महिनाभरात या बाबत प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे जंगले यांनी या लेखी निवेदनात नमूद केले आहे.आश्रमशाळांतील मुलांना पिण्याचे पाणी व दूध शुद्ध मिळत नाही. स्वच्छतेचा मोठा अभाव या आश्रमशाळांमध्ये आहे. प्रत्येक आश्रमशाळेत किमान ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या पार्श्वभूमीवर आतातरी तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती जंगले यांनी केली आहे.आदिवासी आश्रमशाळेतील २७ विद्यार्थ्यांची तपासणीतीन दिवसांपूर्वी पेण तालुक्यातील वरसई येथील रायगड आदिवासी प्रकल्पांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेतील २७ विद्यार्थ्यांना शनिवारी संध्याकाळी विशेष आरोग्य तपासणीकरिता येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले आहे.या सर्व विद्यार्थ्यांना संसर्गजन्य तापाची लागण झाली आहे. त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येत असून, तपासणी पूर्ण झाल्यावर ज्यांना येथे दाखल करणे गरजेचे आहे, अशा विद्यार्थ्यांना येथे दाखल करण्यात येईल, अशी माहिती विद्यार्थ्यांची तपासणी करणारे जिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील व डॉ. ललित अलकुंटे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी