शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार अंगणवाडी सेविकांना एक काेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:57 IST

सरकारकडून भाऊबीज भेट

आविष्कार देसाई

रायगड : सरकारने अंगणवाडी सेविकांची दिवाळी गाेड करण्याचा निर्णय घेतल्याने आनंदाचे वातावरण आहे. एक काेटी सात लाख ६० हजार रुपये जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. तब्बल पाच हजार ३११ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दाेन हजार रुपये आता जमा हाेणार आहेत.

ग्रामीण स्तरावर सरकारच्या याेजना अगदी खाेलवर रुजविण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात. अगदी कमी मानधनावर ते आपले कर्तव्य पार पाडत आहे. पल्स पाेलिओ, तापाचे रुग्ण शाेधणे, नवजात बालकांना लस देणे, गराेदर माता यांना वेळेवर औषध पुरवणे, पाेषण आहार, त्याचप्रमाणे आताच्या काेराेना महामारीच्या कालावधीतही त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. दिवाळी सण म्हटले की आनंद, उत्साह, खमंग फराळ अशा सर्व गाेष्टी अंतर्भूत हाेतात. या कालावधीत सर्वच ठिकाणी आनंदाचे वातावरण असते. दिवाळी सणाच्या अनुषंगाने ग्रामीण भागात झाेकून देऊन काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचीही दिवाळी गाेड व्हावी असे सरकारला वाटले हाेते. त्यानुसार सरकारने त्यांच्यासाठी प्रत्येकी दाेन हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. सरकारने तब्बल एक काेटी सात लाख ६० हजार रुपये रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग  केले आहेत. 

दाेन दिवसांत खात्यावर जमा हाेणार रक्कमअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गाेड करण्यासाठी सरकारने एक काेटी सात लाख ६० हजार रुपये दिले आहेत. सध्या जिल्हा काेषागार विभागात रक्कम आहे. दाेनच दिवसांमध्ये ती रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा हाेणार आहे. जिल्ह्यातील पाच हजार ३११ अंगणावाडी सेविका - मदतनीस यांना त्याचा लाभ हाेणार आहे. पुढील दाेन दिवसांमध्येच त्यांना प्रत्येकी दाेन हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे उशिरा का हाेईना त्यांना दाेन हजार रुपये प्राप्त हाेणार आहेत.

ग्रामीण भागामध्ये अंगणावाडी सेविका, मदतनीस काम करतात. त्यांचीही दिवाळी गाेड करावी हा सरकारचा उद्देश हाेता. रक्कम प्राप्त झाली आहे. पुढील दाेन दिवसांतच ती संबंधितांच्या खात्यावर जमा हाेणार आहे.- डाॅ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड

सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. ग्रामीण स्तरावर आम्ही सरकारची ध्येय, धाेरणे राबवत असताे. दिवाळीच्या आधी लाभ झाला असता तर अधिक चांगले झाले असते. सरकारचे खूप खूप धन्यवाद.- गीतांजली वरसाेलकर, अंगणवाडी सेविका

 

टॅग्स :Raigadरायगड