कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 08:12 IST2020-12-31T08:00:15+5:302020-12-31T08:12:51+5:30

Kashedi Ghat Accident : बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

one dead in road accident on kashedi ghat | कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

कशेडी घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी (31 डिसेंबर) पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रायगड  हद्दीतील पोलादपूर नजीक ( भोगाव ) येथे खासगी आरामबस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघातात एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, 26 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

Web Title: one dead in road accident on kashedi ghat