शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीचे माजी विद्यार्थी बनले गुरू

By admin | Updated: September 5, 2015 03:05 IST

जेएसएम कॉलेज एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांचे गुरू बनण्याचा विडाच उचलला आहे. त्याकरिता त्यांनी ‘एक्स एनसीसी युनिट अलिबाग’ची स्थापना केली आहे

अलिबाग : जेएसएम कॉलेज एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांचे गुरू बनण्याचा विडाच उचलला आहे. त्याकरिता त्यांनी ‘एक्स एनसीसी युनिट अलिबाग’ची स्थापना केली आहे. यामध्ये सुमारे ६० माजी विद्यार्थी स्वेच्छेने सहभागी झाले आहेत. गुरुवारी जेएसएम कॉलेज, माजी विद्यार्थ्यांचे एक्स एनसीसी युनिट अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जेएसएम कॉलेजच्या आजी विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीविषयी आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने तसेच सामाजिक बांधिलकीची भावना विकसित करून सोशल नेटवर्किंगमध्ये अडकलेली तरुण पिढी राष्ट्रहिताकडे वळावी या उद्देशाने एका कार्यक्रमाचे आयोजन जेएसएम कॉलेजच्या केळूसकर सभागृहात करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक म्हणून अत्यंत प्रभावी काम केलेले आणि २६ जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोरील रिपब्लिक डे परेडमध्ये एनएसएसचे नेतृत्व केलेले याच जेएसएम कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि विद्यमान प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेएसएम कॉलेज एनसीसी प्रमुख प्रा.डॉ. मोहसिन खान आवर्जून उपस्थित होते.मुंबई पोलीसमधील विशेष सुरक्षा शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी मार्गदर्शक करताना म्हणाले की, आपण एनसीसीच्या माध्यमातून कसे घडलो हे सांगितले. आपल्या जीवनाचा आतापर्यंतचा जीवनपट उलगडून सांगितला.या वेळी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, गिर्यारोहक नंदकिशोर वडेर, आरडीसीसी बँकेचे मंदार वर्तक, गेल इंडियाचे राष्ट्रीय क्रिकेटपटू प्रीतिलेश चौलकर यांनी आपले विचार व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)