शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका २९ गावांमध्ये राबविणार भुयारी गटार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:46 IST

महासभेची मंजुरी : १६७ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांमध्ये पनवेल महानगरपालिका १६७ कोटींची भुयारी योजना राबविणार आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेच्या मार्फत हा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. मंगळवारी पार पडलेल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.

या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेमणूक करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उघडी गटारे, नाले आदींचा अभाव आहे. अनेक गावांमध्ये गटाराचे पाणी उघडड्यावर वाहत असल्याने गावांमध्ये दुर्गंधी तसेच रोगराईचा फैलाव होण्याची भीती असते. शहरी व ग्रामीण भागात निर्माण झालेली तफावत दूर करण्यासाठी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात पुढाकार घेत भुयारी गटार योजना २९ गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महासभेत एकूण १७ विषय महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. आजची महासभा दुपारी २ च्या वेळेला आयोजित करण्यात आली असल्याने नेहमीपेक्षा महासभेच्या कामकाजाला उशीर होत असल्याने अनेक ठराव घाईघाईत मंजूर करण्यात आले. राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी ठरावांच्या मंजुरीला आक्षेप घेत. पनवेल शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करणे, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचे निवासस्थान बांधणे, पालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदींसह एकूण१६ विषयांना मंजुरी देण्यात आली.महत्त्वाच्या विषयांना महासभेत मंजुरी देण्यात आली. यापैकी पालिकेत समाविष्ट २९ गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भुयारी गटार योजनेला महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या गावांमध्ये शंभर टक्के भुयारी गटारे होणार आहेत.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका 

टॅग्स :Raigadरायगड