शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:17 IST

आरोग्य विभाग झाला सज्ज, पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे

वैभव गायकर पनवेल : ० ते ५ वयोगटातील चिमुकल्यांसाठी राबविली जाणारी पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. पनवेल पालिकेचा आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाला आहे. पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.

पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे. याकरिता ९० हजार पोलिओ डोस प्राप्त झालेले आहेत. कोविडमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे मुलांना या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाले आहे. याकरिता कर्मचारी, पथक तसेच इतर सर्व तयारी पूर्ण झाल्याने ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. कोविड काळात पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याकरिता घरोघरी, एसटी स्टॅण्ड, मुख्य चौक आदी ठिकाणी मोबाइल पथक हे डोस देणार आहेत.

आरोग्य केंद्रात होणार लसीकरणाची प्रक्रिया लसीकरणासाठी पालकांनी रविवारी आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ वयोगटाखालील मुलांना लसीकरणासाठी घेऊन जाणे गरजेचे आहे. रविवारी एक दिवस ही प्रक्रिया चालेल.इतर दिवशी घरोघरी, चौकात, एसटी स्टॅण्ड आदी ठिकाणी मोबाइल पथकांच्या मार्फत हे लसीकरण केले जाणार आहे.

पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेतील कर्मचारी निश्चित झाले आहेत. त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोविड काळात सुरक्षित पोलिओ लसीकरणासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडेल.- डॉ. रेहाना मुजावर, आरोग्य अधिकारी, पनवेल महानगरपालिका