शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:46 IST

ठिकठिकाणी खड्डे : चौपदरीकरणाचे काम संथ गतीने; महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भरावामुळे दुरवस्था

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने होत असल्याने आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संचारबंदी लागू केल्याने, महामार्गाचे काम ठप्प झाले. यामुळे ऐन पावसाळ्यात नवीन रस्त्याकरिता टाकलेला भराव आणि खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.

दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाेचे चौपदरीकरण २०१४ पूर्वीपासून सुरू आहे. इंदापूर ते पळस्पेदरम्यान पहिल्या टप्प्यात नवीन आणि जुन्या महामार्गाचे वाटोळे झाल्यानंतर लगेचच इंदापूर ते कशेडी या दुसºया टप्प्याला प्रारंभ झाला. यामध्येही गती येत नसल्याचे दिसून येत आहे. २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, शासकीय परवाने, शेतकऱ्यांचे प्रश्न, मातीची उपलब्धता आदी अडचणींमुळे हे काम रखडले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून महामार्गाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे ऐन पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाºया दुरुस्तीचे काम झाले नाही. महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भराव, खोदकाम, यामुळे जुन्या रस्त्यावर ऐन पावसाळ्यात मातीचा चिखल आणि खड्डे तयार झाले. आजही ही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने, रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.जागोजागी निर्माण केलेल्या पर्यायी मार्गावर डांबर शिल्लक राहिले नाही, यामुळे पर्यायी मार्गाचा चिखल रस्त्यावर आला आहे. जुना मार्ग आणि पर्यायी मार्गावरील डांबर निघून गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महाडजवळ दासगावपासून गांधारपाले, पुढे नातेखिंड ते नांगलवाडीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात टाकल्या जाणाºया भरावाची अवजड वाहनांमुळे वाट लागत आहे.दुरवस्थेमुळे रुग्णांना त्रासच्कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे निर्मूलन यावर शासनाने भर दिल्याने या विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे. कोकणातून रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाताना याच महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र, महामार्गाच्या दयनीय अवस्थेने रुग्णवाहिकेचे आणि रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर रुग्ण रुग्णालयातपोहोचत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Raigadरायगड