शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू बागायतदारांना मिळणार विमा संरक्षण

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली

ओरोस : प्रायोगिक तत्त्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपीक विमा योजना २०१५ साठी आंबा बागायतदारांना १ लाख विमा संरक्षण तर काजू बागायतदारांना ७५ हजार विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा हप्ता भरण्याची मुदत आंबा बागायतदारांसाठी ३१ डिसेंबर २०१५ तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर २०१५ असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए. एल. नातू यांनी दिली.आंबा व काजू बागायतदारांसाठी शासनाने १० सप्टेंबर २०१४ पासून फळपीक विमा योजना सुरू केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून बिगर कर्जदारांना ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. आंबा बागायतदारांसाठी प्रति हेक्टरी वर्षाला ६ हजार रुपये तर काजू बागायतदारांना वर्षाला ४ हजार ५०० रूपये विमा हप्ता आहे.१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत १०.५ अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान असेल तर अशा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत ११ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान असेल तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ मार्च ते ३१ मे २०१५ या कालावधीत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. विमा हप्ता भरण्यासंदर्भात कृषी विभागाचे मंडळ अधिकारी, तालुका अधिकारी, उपविभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र वाकडे यांनी केले आहे. (वार्ताहर)आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली१ जानेवारी ते १५ मे २००५ या कालावधीत अवेळी पाऊस पडला तर आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ही नुकसानभरपाई एका दिवसात जर ५ मि.मी. पाऊस पडला तर ८ हजार, २ दिवस पाऊस पडला तर १२ हजार व ३ दिवस पडला तर २० हजार अशी मिळणार आहे. जर एक दिवस ५ मि.मी. पाऊस पडला तर काजू बागायतदारांना १० हजार, दोन दिवस पडला तर २० हजार, तीन दिवस पाऊस पडला तर ३५ हजार व चार दिवस पाऊस पडला तर ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई हेक्टरी मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत पाऊस पडला तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळेल.