शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बँकेची योजनेसाठी दिलेल्या मदतीवर नजर

By admin | Updated: July 27, 2015 03:04 IST

भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये जागतिक बँक कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील

आविष्कार देसाई , अलिबागभारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये जागतिक बँक कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना आणि जल स्वराज्य टप्पा- दोन या प्रकल्पांचा समावेश आहे. देण्यात येणाऱ्या मदतीवर जागतिक बँकेने आपली नजर रोखली आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी आढावाही घेण्यात येणार असल्याने कागदावरील आणि जमिनीवरील कृतीबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता अपडेट राहावे लागणार आहे.रायगड जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७१ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत, तर ३५३ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी आहे. या ग्रामपंचायती निर्मल करण्याकडे रायगड जिल्हा परिषदेचा कल असून २०१९ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचे आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत प्रत्येकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणे आणि जल स्वराज्य टप्पा दोनअंतर्गत टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करणे हे आहे. या प्रकल्पांसाठी जागतिक बँकेने कोट्यवधी रुपयांचा निधी भारत सरकारला देऊ केला आहे. या निधीचा योग्य पद्धतीने वापर होतो की नाही यासाठी जागतिक बँकेने विविध पथके नेमली आहेत. रायगड, औरंगाबाद, पुणे आणि जळगाव या चार जिल्ह्यात जागतिक बँकेचे पथक पाहणी करणार आहे. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.