देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

By Admin | Updated: September 22, 2015 03:47 IST2015-09-22T03:47:19+5:302015-09-22T03:47:19+5:30

परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्वलंत विषयावर देखावे उभारले आहेत. या व्यतिरिक्त धार्मिक, ऐतिहासिक व चालुघडामोडींवर भाष्य करणारे देखावे तयार करण्यात आले

Light on social issues through the scenes | देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

पनवेल : परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्वलंत विषयावर देखावे उभारले आहेत. या व्यतिरिक्त धार्मिक, ऐतिहासिक व चालुघडामोडींवर भाष्य करणारे देखावे तयार करण्यात आले आहेत. ते पाहण्याकरीता भाविक मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत. यंदा जवळपास दोनशेपेक्षा जास्त लहान मोठया मंडळांनी आकर्षक मंडप तयार करून त्या ठिकाणी नवनवीन संकल्पना देखाव्याच्या रूपाने साकारल्या आहेत. धार्मिक सांस्कृतिक विषयांबरोबरच ज्वलंत सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकीत यामाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आपला गणेशोत्सव शिस्तबध्द असावा याकरीता मंडळा मंडळांमध्ये स्पर्धा लागली आहे.
पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या जास्त आहे . पनवेल शहरात आजही अनेक जुन्या मंडळांनी उत्सव परंपरा जपली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही नवीन पनवेल, खांदा वसाहत परिसरात सार्वजनिक गणशोत्सवाच्या ठिकाणी देखावे उभारले आहेत. याकरीता खास कलाकार, वास्तुविशारदांची मदत घेण्यात आली आहे. विशेषत: गणेशभक्तांना आकर्षीत करण्यासाठी चलचित्रांचे देखावे उभारण्यात आले आहेत.
पनवेलमधील सन्मीत्र मंडळाकडून महिलांवरील अत्याचार, छेडछाड या ज्वलंत विषयावर देखावा उभारला आहे. यामध्ये मुलींची कशा प्रकारे छडछाड केली जाते याचे चित्रण करुन याबाबत जागृगता निमाण करण्याचा प्रयत्न केला आहे. टपाल नाका येथील शिनमंदीरात मोगलीचा देखावा चलचित्राच्या माध्यमातून तयार केला आहे. विद्याथ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे, पालकांचा दबाव, मोबाईलमध्ये दंग असलेले तरूण पिढी अशा सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर मुलांसंदर्भात विविध विषयांना हात घालण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Light on social issues through the scenes