शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडीत काळनदीवरील कोल्हापुरी बंधारा तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:17 IST

महापुरात नुकसान : दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्यास पाणीप्रश्न होणार गंभीर; शेतकऱ्यांची होणार गैरसोय

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळनदीवरील कोल्हापुरी बंधारा महापुरामध्ये तुटला. यामुळे दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध न झाल्यास बिरवाडी परिसरातील पाणी समस्या गंभीर बनण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये बिरवाडी काळनदीवरील कोल्हापुरी बंधाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या कोल्हापुरी बंधाºयावर महापुराच्या वेळी मोठमोठी लाकडे येऊन आदळली, त्यामध्येच या कोल्हापुरी बंधाºयाच्या बिरवाडी बाजूकडील भाग पुराच्या पाण्याने निकामी झाला; तर बंधाºयाच्या वरील भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने या बंधाºयावरून होणारी शेतमालाची वाहतूक महाराष्ट्र शासनाच्या लघु-पाटबंधारे विभागाने पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे बिरवाडी, खरवली भागातील शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत लघु-पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बंधाºयाच्या दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ या बंधारादुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तीन ग्रामपंचायतींमधील गाव, वाड्यांना होतो पाणीपुरवठाबिरवाडी काळनदीवर लघु-पाटबंधारे विभागामार्फ त कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा घालून नदीमधील पाणीपातळी वाढविली जाते, त्यानंतर हे पाणी वापराकरिता एमआयडीसीच्या जॅकवेलमधून पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवण्यात येते. त्यानंतर निगडे, मोहोत, भावे, या ग्रामपंचायतींमधील अनेक गावे, वाड्या यामधील जनतेला याच पाण्याचा पुरवठा जॅकवेलद्वारे केला जातो. डिसेंबर अखेरपर्यंत कोल्हापुरी बंधाºयाने पाणीसाठा साठविला जातो. मात्र, बंधाºयाचे नुकसान झाल्याने या परिसरातील नागरिकांना पाणीसमस्येचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड