शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या परिघावर कातकरी उपरेच!

By admin | Updated: September 6, 2015 22:20 IST

महिगाव येथील कुटुंबांची दैनावस्था : ना रस्ता, ना पाणी; ना रोजगार, ना आरक्षणाचा लाभ

सायगाव : अनेक पंचवार्षिक आल्या गेल्या, अनेकदा सत्तापालट झाला, विकासाच्या त्याच त्या पोकळ घोषणा झाल्या. जुने गेले, नवे आले, तेच ते कित्ते गिरवून झाले; पण विकास कशाला म्हणतात ते गरीब जमातील अजून माहीतच नाही. कारण गेल्या पन्नास वर्षांत यांच्या वस्तीपर्यंत स्वातंत्र्य अजून फिरकलंच नाही. स्वातंत्र्याचं केलं काय? आमच्या वाट्याला आलंच नाय, असा परखड प्रश्न आता हे आदिवासी विचारू लागलेत. सायगाव विभाग हा तालुक्याच्या तुलनेत विकसित मानला जातो; मात्र या पुढारलेल्या गावांना लागून गावकुसाच्या अडोशाने गेले कित्येक वर्षे आदिवासी कातकरी समाज खितपत पडलेला आहे. ओढ्यातील खेकडे, मासे पकडून त्यावर कशीबशी उपजीविका करीत आहेत. अनेकदा पुराच्या पाण्याचा धोका आणि लगतच असलेली स्मशानभूमी अशा दुरवस्थेत राहणाऱ्या लोकांना काही वर्षांपूर्वी हौसाबाई यशवंत सणस आणि यशवंत सणस यांनी आपली हक्काची जागा उपलब्ध करून दिली. महिगावपासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगरालगत पायथ्याला गेली कित्येक वर्षे सुमारे अठरा कुटुंबे अत्यंत बिकट अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. अत्यल्प शिक्षणामुळे कुठेही रोजगार मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या रोजगारावर मिळेल तेव्हा शेतमजुरी करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यांना पाणी असल्याने मासे, खेकडे फार कमी मिळतात. एवढ्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे जिकिरीचे बनते. घरात खाणारी तोंडे भरपूर असल्यामुळे अनेकदा कर्जाशिवाय गत्यंतर नसते. मात्र, रोजगाराचे साधन नसल्याने परतफेडीची हमी मिळत नाही. अशावेळी संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करते. कुणाकडेही शेती नसल्यामुळे सर्व गोष्टी विकत घेऊन खाणे परवडत नाही. (वार्ताहर)कोण आहेत कातकरी ?कातकरी ही एक महाराष्ट्रातील प्रमुख आदिम शिकारी जमात समजली जाते. यांना कातकरी, काथोडी, दोर कातकरी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागांत ओळख आहे. अत्यंत दयनीय, गरीब मागास समाज म्हणून ही जमात ओळखली जाते. शिकारीवर बंदी असल्याने ते फक्त मासे आणि खेकड्यांवर उपजीविका करतात. या जमातीचे कोठेही भक्कम नेतृत्व नाही. गावाच्या आडोशाने हे जीवन जगतात. श्रमिक सारख्या अनेक संस्था यांच्या स्थलांतर व उपजीविकेवर काम करत आहे. बचत गटामधून बांधणीचे प्रयत्नही शासन करीत आहे.पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या जमातीला सरपंचपदाची संधी मिळाली होती. मात्र, ऐनवेळी दुर्लक्ष झाल्यामुळे हा समाज नेतृत्वापासून वंचित राहिला.  - बाळासाहेब सणस, कार्यकर्तामाझे आई-वडील मासे पकडायला जातायत; पण या दिवसात खूप कमी मासे मिळतात. आता कुणी कामावर बोलवले तर जाणार नाहीतर आजचा दिवस वाया.  - वसंत पवार, आदिवासी युवकगेली अनेक वर्षे आम्ही या आदिवासींसोबत राहतो; पण आजतागायत यांना रस्ता नाही, पाणी नाही. हे सर्व मिळाल्याशिवाय आज त्यांना गत्यंतर नाही.  - हौसाबाई सणस, आदिवासी कार्यकर्त्या