शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत पोलीस ठाण्याचा जनरेटर अडगळीत

By admin | Updated: May 13, 2017 01:05 IST

कर्जतमध्ये वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील संगणकीय शासकीय कामकाज बंद पडून त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

नेरळ : कर्जतमध्ये वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील संगणकीय शासकीय कामकाज बंद पडून त्याचा विपरीत परिणाम होत आहे. परिणामी फिर्यादींना हवी असलेली एफआयआरची प्रत मिळण्यास, तसेच अन्य कामास अडथळा निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून सुमारे दोन वर्षांपूर्वी कर्जत पोलीस ठाण्यात लाखो रु पयांचा उच्च दाबाचा नवीन जनरेटर आणण्यात आला, परंतु हा जनरेटर अद्याप जोडला न गेल्याने अडगळीत धूळ खात पडला आहे.काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी लाखो रु पयांचा निधी उपलब्ध करून कर्जत पोलीस ठाण्याचे रु पडे बदलत त्याला कार्पोरेट लूक देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधेपासून ते तक्र ार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या आसन व्यवस्थेसाठी पोलीस ठाण्यात तसेच बाहेरही सोय करण्यात आली. मात्र याच पोलीस ठाण्यात सुमारे दोन वर्षापासून लाखो रु पयांचे नवीन जनरेटर उपलब्ध असूनही त्याची जोडणी मात्र केलेली नाही. तीच परिस्थिती आजही कायम आहे.संगणकीय युग असल्याने कर्जत पोलीस ठाण्यातही संगणकाचा वापर करण्यात येतो. यामध्ये फिर्यादीची तक्र ार नोंदविणे, जबाब टाईप करणे, कंट्रोलला माहिती देणे, फिर्यादीला एफआयआरची प्रत देणे, पासपोर्ट आदी आॅनलाइन पत्रव्यवहारही होतो. यासाठी संगणक कायमस्वरु पी सुरू राहण्यासाठी वीजप्रवाह सुरळीत सुरू असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु मागील काही महिन्यांपासून वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संभाव्य बाबींचा विचार करता यावर उपाय म्हणून उपलब्ध असलेल्या जनरेटरची जोडणी करणे आवश्यक आहे, जेणेकरु न वीज प्रवाह खंडित झाल्यास कामकाजात अडथळा येणार नाही.