शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात अवैध उत्खनन सुरूच

By admin | Updated: May 9, 2017 01:30 IST

कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा माती उत्खनन सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भर दिवसा जेसीबी

कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा माती उत्खनन सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भर दिवसा जेसीबी, डंपरच्या साहाय्याने जमीन व टेकड्या फोडून बिनधास्तपणे मातीची चोरी होत आहे. उन्हामुळे परिसरातील नद्या, तलाव आटले आहेत, त्यामुळे नद्यांमधूनही रेती उत्खनन सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून महिनोन्महिने सुरू असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. कर्जत तालुक्यासह नेरळ व परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून जमीन सपाट करण्याचीही कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे जमिनीमध्ये जेसीबी फिरवताना रॉयल्टी भरून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी घेऊन सुरू असलेली कामे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना अधिकारी तसेच गावपातळीवर काम करणारे तलाठी यांच्याकडून अवैध माती उत्खननाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यात महसूल खात्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना अवैध उत्खननावर मोहीम राबविण्याचे अधिकार नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र महसूल खात्याकडून बेकायदा माती आणि रेती उत्खनन करताना कारवाई केली जात आहे. पण कर्जत तालुक्यात मात्र कारवाई होताना दिसत नाही. यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आहे. जमीन सपाटीकरणासाठी माती उत्खननातून रॉयल्टी मिळत असली तरी त्यातून होणारी पर्यावरणाची हानी धोक्याची आणि तोट्याची आहे. महसुलासाठी निसर्ग नष्ट करण्याच्या या प्रकारामुळे भविष्यात मोठे संकट उभे करण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.