शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखांची मदत

By admin | Updated: September 5, 2015 22:57 IST

फेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर

- सिकंदर अनवारे,  दासगांवफेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर ही मोठ्या प्रमाणात गळूण गेला होता. याची भरपाई म्हणून महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान पोटी ३ करोड ६५ लाखाची मदत जाहीर केली असूनही मदतीची रक्कम महाड तहसिल कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे.पावसाळ्यात कोकणातील बळीराजा हा निसर्गावर अवलंबून राहून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतो आणि पावसाळा संपता संपता कडधान्याची ठोकणी व पेरणी करुन जवळपास मार्च महिन्यापर्यंत दुबार कडधान्याचेही पिक काढतो.मात्र यंदा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळावधीमध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकाऊन नेला होता. यामुळे पावटा, वाल, तूर, मुंग, हरभरा, मटकी अशी अनेक कडधान्याची पिके या पावसामुळे नासधुस झाली होती. यावेळी तलाठ्यांमार्फत प्रत्येक विभागाचे नुकसानीचा पंचनामे करण्यात आले होते. शासनाने याची दखल घेत महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखाची मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांना वाटपासाठी ही रक्कम महाड तहसिल कार्यालयाकडे वर्ग केली आहे.या नुकसानाचे निकष काढत शासनाने ज्या शेतकऱ्यांचे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर ज्या शेतकऱ्यांचे कडधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी एक हजार अशी मदत देण्यास जाहीर केली आहे. या लागणाऱ्या पावसामध्ये २५०३ अंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर ४९७१ कडधान्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी होते. फेब्रुवारी व मार्चमध्ये महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांचे आंबापिके व कडधान्याचे नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडून पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे ३ कोटी ६५ लाखाची मदत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. पंचनाम्याच्यावेळी ७/१२ किंवा पासबूक झेरॉक्स घेण्यात आली नव्हती. लाभार्थी शेतकऱ्यांची नावे प्रत्येक सजेतील तलाठ्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यांनी ७/१२, बँकखाते पासबूक झेरॉक्स जमा केल्यावर लगेच पैसे वर्ग होतील.- संदीप कदम, तहसीलदार, महाड