शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रोहा तालुक्यात वादळी पावसाने नुकसान

By admin | Updated: May 14, 2017 22:48 IST

तालुक्यातील खांब, देवकान्हे विभाग यासह तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह गारपीट पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : तालुक्यातील खांब, देवकान्हे विभाग यासह तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह गारपीट पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली, तसेच लग्न मंडप व गुरांचे गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. सोसाट्याच्या वादळात लग्न मंडपासह घरावरील पाइप व त्यावरील पत्रे, गुरांचे गोठे व काही घरे जमीनदोस्त झाली आहेत.तालुक्यातील खांब, देवकान्हे, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे या गावांना जोरदार गारपीट पाऊस व चक्र वादळाने मोठा दणका दिला. यामध्ये अनेकांच्या घरांची पडझड झाली असून विद्युत खांब, विद्युत तारा व झाडे कोसळली, मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. चिल्हे येथील शिंदे कुटुंबीयांकडे साखरपुडा कार्यक्र म सुरू असतानाच अचानक चक्र ीवादळ, गारपीट पाऊस सुरू झाल्याने साऱ्यांचीच धांदल उडाली. या कार्यक्र मात उपस्थित बाहेरगावहून आलेली पाहुणे मंडळी व ग्रामस्थांची तारांबळ उडाली तर अनेक घरांची पडझड होवून अतोनात नुकसान झाले आहे.चिल्हे येथील हरी शंकर महाडिक यांचे घर पूर्णत: पत्र्यासह भिंती कोसळून जमीनदोस्त झाले, तसेच चिल्हे येथील बाळा शंकर महाडिक, तुकाराम महाडिक, हरी गंगाजी लोखंडे, विलास महाडिक, नथुराम महाडिक, जितेंद्र महाडिक, सटू महाडिक, तळवली येथील रघुनाथ कोस्तेकर, अशोक कोस्तेकर, स्वप्नील मरवडे, अजित चितळकर, यशवंत चितळकर व गणेश कुंभार, नडवली येथील पांडुरंग जाधव, एकनाथ पवार, यशवंत लाडगे, वसंत मोकाशी, लक्ष्मी मालुसरे, धानकान्हे येथील नामदेव देवकर यांच्या घरावरील तसेच या विभागातील श्रमिक विद्यालय चिल्हे हायस्कूलचे पाइपांसह पत्रे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उडवून गेले आहेत. चिल्हे, बाहे, मुठवली, गोवे येथील भाजी व्यावसायिक यांचे भाजी शेतीचे तसेच खांब, पुगाव, पुई या विभागातील भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या विभागातील सर्कल अधिकारी तांडेल अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सजा तलाठी नितीन शेळके, ग्रामसेवक पाटील, पोलीस पाटील खेळू मरवडे, ग्रामस्थ रघुनाथ कोस्तेकर, तुकाराम महाडिक, हरी महाडिक व प्रमोद लोखंडे यांच्या उपस्थितीत या उद्ध्वस्त झालेल्या घरांचे, भाजी व भातशेती याचा पंचनामा केला असून लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदत दिली जाईल, असे सांगण्यात आले.