शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:40 IST

मार्गातील खड्ड्यांमुळे ६ मार्च रोजी बुधवारला चामोर्शी तालुक्यात बुधवार हा अपघातवार ठरला. चामोर्शी-घोट, चामोर्शी-आष्टी मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीला हलविले : चामोर्शीत बुधवार ठरला अपघातवार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मार्गातील खड्ड्यांमुळे ६ मार्च रोजी बुधवारला चामोर्शी तालुक्यात बुधवार हा अपघातवार ठरला. चामोर्शी-घोट, चामोर्शी-आष्टी मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चामोर्शी ते घोट, आष्टी व मूल हे तीनही मार्ग खड्डेमय झाल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे.चामोर्शी-घोट मार्गावर कृष्णनगरजवळ मारोती बलोनो कार व दुचाकीची सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वारासह मागील सिटवर बसलेली महिला जखमी झाली. एमएच-३३-व्ही-२०२७ या क्रमांकाचे मारोती बलोनो वाहन चामोर्शीवरून घोटकडे जात होते. दरम्यान एमएच-३३-पी-६९८३ क्रमांकाची दुचाकी विरूद्ध दिशेने येत होती. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात या दोन वाहनाची समोरासमोर धडक बसली. सदर धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी ही चारचाकी वाहनाच्या बोनेटवर चढली व काच पूर्णत: फुटली. या अपघातात नरेश देवराव येरावार, चंदा देवराव येरावार, देवराव कवडू येरावार अशी जखमींची नावे आहेत. या जखमींना सुरूवातीला चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालात हलविण्यात आले.दुसरी घटना दुपारी १२.३० वाजता चामोर्शी-आष्टी मार्गावरील घोट वळणावर घडली. येथे दोन दुचाकींची धडक होऊन एक मुलगी जखमी झाली. देविका कमलेश मडावी (१८) असे जखमी मुलीचे नाव आहे. या मुलीसोबत दुचाकीवर प्रफुल मंगर व अजित पाल हे दोघेजण होते. मात्र या अपघातात त्यांना काहीही झालेले नाही. सदर अपघातातील विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावरील निखिल बाबुराव कुरवटकर (१९) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या दोघांनाही जमावातील काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले. दरम्यान याचवेळी आष्टी-चामोर्शी मार्गावर एका वृद्ध इसमाच्या दुचाकीला अपघात झाला. यात वृद्ध इसमाचा पाय दुचाकीत सापडल्याने तो किरकोळ जखमी झाला. सदर दोन अपघातातील जखमी चार जणांवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तर देविका मडावी या जखमी मुलीवर चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.सिरोंचा मार्गावर वाहन उलटलेआलापल्ली-सिरोंचा मार्गावर गोलाकर्जीवरून चार किमी अंतरावर सिमेंटच्या बॅग घेऊन जाणारे वाहन उलटले. यात वाहनाचा चालक जखमी झाला. सदर घटना रिंग पुलावर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्तोवर या अपघातातील चालकाचे नाव कळू शकले नाही. सिरोंचा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात