शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका ३१ ऑगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:57 IST

तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ ऑगस्ट रोजी होणार आहेत. शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

कर्जत : तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी होणार आहेत. शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.१९ आॅगस्ट रोजी अर्जांची छाननी होणार असून, २१ आॅगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि त्याच दिवशी चिन्हवाटप करण्यात येणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून, ३ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर सहा प्रभागातील १७ जागांसाठी १०० नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली.उमरोलीत थेट सरपंचपदाच्या जागेसाठी सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर पाच प्रभागातील १३ जागांसाठी ५० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी दिली.वाकसमध्ये सरपंचपदाच्या एका जागेसाठी सात नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर चार प्रभागातील ११ जागांसाठी ३१ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी सांगितले.जामरुंगमध्ये सरपंचपदाच्या जागेसाठी तीन नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर तीन प्रभागांत नऊ जागांसाठी २० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.रजपेमध्ये सरपंचपदासाठी सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर तीन प्रभागांतील सात जागांसाठी २५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.१९ आॅगस्टला अर्जांची छाननीपाच ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या जागेसाठी ३५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, तर पाच ग्रामपंचायतीमधील एकूण ५७ सदस्यांसाठी २२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. १९ आॅगस्ट रोजी छाननी करण्यात येणार असून, २१ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक