शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

हवामान विभागाच्या यंत्रणेचा मालवणात मच्छिमारांना फटका

By admin | Updated: October 27, 2014 00:01 IST

वीज वाहिन्यांकडे संबंधितांचे दुर्लक्ष

मालवण : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा तडाखा बसला. परंतु याबाबतची आगाऊ सूचना देण्यात हवामान विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. यामुळे मासेमारीस गेलेल्या मच्छिमारांना फटका बसला. मालवण किनारपट्टीवरील तळाशिल येथील मच्छिमार रात्री उशिरा किनाऱ्यावर परतले तर मालवणच्या पालखी सोहळ्यानिमित्त सज्ज राहिलेल्या व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला.गेल्या दोन दिवसांपासून गोवा किनारपट्टीवर जोराने वाहणारे वारे सायंकाळी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर थडकले. मात्र, या वादळी हवामानाची पूर्वसूचना हवामान विभागाकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे देवगड व मालवण तालुक्यातील मच्छिमार सायंकाळी मासेमारीस गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मालवण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा झाला. वाऱ्याचा जोर पाहून किनाऱ्यावर नांगरलेल्या नौकांना आणखी एक नांगर लावण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरु झाली. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील बंदर विभागाशी मागील दोन दिवसांतील हवामानाबद्दल विचारले असता त्यांनी शुक्रवारच्या वादळी हवामानाबद्दल आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असे सांगितले. शनिवारी मात्र बंदर विभागाला येत्या ४८ तासात अतिवृष्टी होणार असल्याचा संदेश देण्यात आला होता. हवामान खात्याच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वीज वाहिन्यांकडे संबंधितांचे दुर्लक्षवादळी हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच शासनाने मोबाईल सेवेचाही विस्तार करावा, अशी मागणी मच्छिमारांमधून होत आहे. कुडाळ येथून मालवण तालुक्याला वीज पुरवठा केला जातो. गेली कित्येक वर्षे कुडाळ येथून मालवणला येणाऱ्या वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीकडे नीट लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे वादळी हवामानानंतर वीजपुरवठा खंडित होत राहतो.