शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाघाच्या दर्शनाने दांडगुरी परिसरात भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 12:29 AM

वनविभाग घटनास्थळी; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्री परिसरातील झुडपांमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागाला कळवताच तात्काळ घटनास्थळी त्यांनी भेट दिली. तसेच वाघसदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव. थंड वातावरण असलेला परिसर म्हणून याठिकाणाला ऐतिहासिक प्रसिद्धी आहे. विशेष म्हणजे वाघ दिसल्याचे कळल्यापासून परिसरात आणखी दहशत निर्माण झाल्याने कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दांडगुरी, वाकलघर, आसुफ तसेच बोर्ला भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याभागात नदी देखील वाहत आहे. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते. कोरोनाच्या दहशतीत आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत. रात्री १० च्या सुमारास दांडगुरी परिसरात वाघ दिसल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांना देण्यात आली. लागलीच बोर्ली राऊंड पथकाचे बुरान शेख, प्रतीक गजेवार, एल. एम. गिराने यांनी घटनास्थळी भेट दिली व संशयित प्राण्याचे ठसे घेऊन वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

आम्ही घटनास्थळी गेलो असता, संशयित प्राण्याचे ठसे उमटले होते. तपासासाठी ठसे पुढे पाठवले आहेत. नागरिकांनी जागरूक राहावे. जनावरांना आपल्या गोठ्यात बांधून ठेवावे. या घटनेमुळे वनविभाग सतर्क राहील.- मिलिंद राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन

गुरुवारी रात्रीच्यावेळी बाईकस्वाराने वाघ दिल्याचे सांगितले. आम्ही ताळत्का तिकडे गेलो असता, वाघ पळून गेल्याचे निदर्शनास आले, मात्र काळोख असल्याने पुढे गेलो नाही. तात्काळ वनविभागाला कळविले व अधिकाऱ्यांनीदेखील भेट दिली.- ग्रामस्थ, दांडगुरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTigerवाघ