शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

दरवर्षी भारतीय पचवतात १ लाख ३४ हजार कोटींची औषधे- महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:53 PM

धारकर महाविद्यालयाच्या वतीने ‘जागतिक फार्मासिस्ट डे’चे आयोजन

कर्जत : चौथी औद्योगिक क्रांती येणार आहे. आॅनलाइन फार्मसी धोकादायक ठरू शकते. ते रुग्णांनाही अडचणीचे ठरेल कारण त्यांना औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता आहे. आॅनलाइन पद्धतीमुळे मादक औषधांचा दुरुपयोग होऊन व्यसनाधीनतेची भीती आहे तसेच गर्भपाताचे किट उपलब्ध होऊन त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १३५ कोटी असली तरी दरवर्षी चारशे कोटी रुग्ण औषधे खरेदी करतात. त्यामुळे एकवीस हजार कोटी रुपयांचा नफा फार्मसी व्यवसायात होतो. विशेष म्हणजे एक लाख चौतीस हजार कोटी रुपयांची औषधे दरवर्षी भारतीय पचवतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी दिली.कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट डेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. झगडे म्हणाले, १९४७ मध्ये भारतीयांचे आयुर्मान सरासरी ३२ वर्षे होते आता ते ६९ वर्षे आहे. यामागे आपल्या सर्व फार्मासिस्टचे योगदान आहे. देशातील आठ लाख फार्मसीमध्ये आठ लाख फार्मासिस्ट आहेत. काही ठिकाणी फार्मासिस्ट जागेवर नसतात. खरे तर अ‍ॅपरन घालूनच फार्मासिस्टने दुकानात उपस्थित रहावे, असे सूचित केले.प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात, फार्मासिस्ट झाल्यावर रुग्णाला दैवत मानून त्याच्यासाठी देवदूत म्हणून त्याला सेवा देणे अंगीकारावे. अजूनही आपल्याकडे अशिक्षित रुग्ण येत असतात. त्यांना औषधाच्या वेळा व मात्रा कशा द्याव्यात हे समजावून सांगून औषधांचे दुष्परिणाम आवर्जून सांगावेत, असे स्पष्ट केले. देबेश दास यांनी, ज्याप्रमाणे औषध उत्पादनात आपल्या देशाची प्रगती होत आहे त्यावरून येत्या पाच वर्षात भारतीय औषध व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना मेहनत घेणे हे प्रत्येक फार्मासिस्टचे काम आहे, असे स्पष्ट सांगितले. याप्रसंगी फार्मसी कन्सल्टंट ब्रिज सारडा, गुफिक लॅबरोट्रीजचे अध्यक्ष देबेश दास, अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहायक आयुक्त साहेबराव साळुंखे, रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील आदी उपस्थित होते. रायगड, औरंगाबाद, बुलढाणा, सिन्नर, नागपूर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आदी जिल्ह्यातून फार्मासिस्ट शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :medicinesऔषधं