शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:58 IST

Raigad News : सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. 

- आविष्कार देसाईरायगड - सरकारी नाेकरीकडे डाेळे लावून बसलेल्या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा यादीवरील तब्बल ५० उमेदवारांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.किरण पाटील यांनी या नियुक्त्यांच्या फायलीवर स्वाक्षऱ्या करून ऐन दिवाळीच्या ताेंडावर उमेदवारांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना अतिशय कष्टमय जीवन जगावे लागले आहे. कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण केले आहे. मात्र, त्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील फायली वर्षानुवर्षे गठ्ठ्यात दबल्या गेल्या हाेत्या. त्या आता बाहेर काढून मृतांच्या वारसांना न्याय देण्याचे काम डाॅ.पाटील यांनी केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषदेकडे एकूण ७९ अर्ज आले हाेते. पैकी ५० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आराेग्यसेवक पुरुष-११, ग्रामसेवक-१०, परिचर-९, शिक्षक-५, पर्यवेक्षिका-३, स्त्री परिचर-३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-२, वरिष्ठ सहायक लिपिक-२, कनिष्ठ अभियंता बांधकाम-२, कनिष्ठ सहायक लेखा-२, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा)-१, औषध निर्माण अधिकारी-१ यांचा समावेश आहे. वेळाेवेळी निर्गमित झालेल्या सरकारी निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.सरकारच्या याेजना सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम आहे. दीर्घ कालावधीपासून अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचा प्रश्न प्रलंबित हाेता. मृतांच्या वारसांना वेळेवर त्यांचा हक्क मिळणे गरजेचे हाेते. यासाठी निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पाठबळ मिळाले.- डाॅ. किरण पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद 

सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना शिक्षण पूर्र्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळतेच असे नाही. कोरोना परिस्थितीत तर अनेकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील वारसांना आता नोकरी मिळणारआहे. 

टॅग्स :jobनोकरीRaigadरायगड