शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमधील रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण; चालकांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 23:36 IST

तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे.

- गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार, या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनचालक आहेत. तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढल्याने डोकेदुखी वाढली आहे.तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. दिघीपासून आदगाव, तसेच वेळास, मेंदडी व गोंडघर या सर्व परिसरातील ग्रामस्थांना बोर्लीपंचतन शहरातील बाजारपेठ व इतर वैद्यकीय उपचारासाठी यावे लागते. मात्र, बोर्लीपंचतनकडे जाणाऱ्या रस्त्याला खड्डेच असल्याने आजारी, तसेच वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. वेळास ते आदगाव रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे ना अधिकाºयाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींना पडली आहे. सध्या महामार्ग असलेल्या माणगाव ते दिघी मार्गावरील दिघी-वेळास या दरम्यानचा रस्ता वनखात्याच्या आडकाठीमुळे रखडला आहे. हाही रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. बोर्लीपंचतन ते वांजळे हा रस्ता नुकताच बनवला होता. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यांवर खड्डेच पडले आहेत. धनगरमलईकडे जाणाºया रस्त्यांवरही असेच खड्डे पडले आहेत. लोकप्रतिनिधींनीयाकडे लक्ष दिल्याने रस्ते सुस्थितीत होतील, हिच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने, येथील संबंधित रस्ते बनवणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामकाज होत नाही.पावसामुळे शिस्ते गावाजवळील रस्त्यावर दरवर्षी पुराचे पाणी येते. त्यामुळे हा रस्ता खड्डेमय बनतो. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीत नव्याने साकव तयार करून रस्त्याची उंची वाढवल्याने या रस्त्याची दुरवस्था व पुरातील पाण्याचाधोका टळेल. - देवेंद्र नार्वेकर, रहिवाशी, दिवेआगरबोर्लीपंचतन परिसरातील रस्ते खड्डेमय बनले असून, सध्या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास तात्पुरता प्रवाससोयीचा होईल.- प्रवीण वडके,चालक.या रस्त्यांचे कामे बजेटनुसार मंजूर झाले आहेत. उर्वरित प्रक्रियेनुसार या रस्त्यांच्या डागडुजीसोबत नव्याने डांबरीकरण लवकरच होईल.- श्रीकांत गनगणे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड