शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: July 25, 2015 22:43 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे जनसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. यामध्ये चोऱ्या, मारामाऱ्या आणि महिलांशी

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे जनसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. यामध्ये चोऱ्या, मारामाऱ्या आणि महिलांशी निगडित घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक बनत असताना, रायगड पोलिसांच्या माध्यमातून या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता नेमकी काय उपाययोजना करण्यात येत आहे वा किती गुन्ह्यांतील किती गुन्हेगारांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने, पोलीस यंत्रणा नेमके काय करीत आहे याबाबत जनसामान्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.महाडमध्ये चोरट्याने कुलूप उघडून घरातील १५०० रुपये किमतीचा लावा कंपनीचा मोबाइल, ३ ड्रेस व चार हजार रुपये रोख असा ऐवज, शुक्रवारी सकाळी १०.३० ते २.१५ यावेळी घरफोडी करून चोरून नेला आहे. या घरफोडीप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.मोहोपाडा येथील नाकोडा ज्वेलर्स नावाच्या सोन्या-चांदीच्या दुकानात चोरट्याने शटर लोखंडी पहार व कटावणीसारख्या हत्याराने उचकटून वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे १० ग्रॅम वजनाचे मणी व ४ लाख १० हजार रुपये किमतीची १३ किलो वजनाची चांदीची भांडी असा ऐवज शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरून नेला. रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील घाग क्लासमधून शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास १२ हजार रुपये किमतीच्या मोबाइलची चोरी झाली. रोहो पोलीस ठाण्यात चोरीची नोंद आहे.महाड तालुक्यात सापेतर्फेगोवले या गावातील विठ्ठल मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे दोन ते तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. महाड पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरू आहे. (विशेष प्रतिनिधी)घराच्या बांधकामातून राजपुरी येथे झालेल्या वादातून संगनमताने शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, त्याचा जाब विचारला म्हणून लोखंडी फावड्याने तक्रारदारास मारहाण केल्याप्रकरणी मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अलिबागजवळच्या गरुडपाडा येथे तक्रारदार हे त्यांच्या राहत्या घरी साफसफाई करीत असताना यातील आरोपीने त्यांच्या घरात घुसून तक्रारदारास शिवीगाळी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.