शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमेनिमित्त खोपोलीत भक्तांची मांदियाळी

By admin | Updated: July 31, 2015 23:11 IST

खोपोलीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम:’ चा गजर करीत हजारो भक्तांनी गगनगिरी आश्रमात येवून महाराजांच्या

खोपोली: खोपोलीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम:’ चा गजर करीत हजारो भक्तांनी गगनगिरी आश्रमात येवून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या खोपोलीत गुरु पौर्णिमेच्या दिवशी ४० ते ५० हजार भक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गुरु वारी सायंकाळी ७ वाजल्यापासूनच ठाणे, मुंबई, कोकण ते थेट कोल्हापूरपर्यंतच्या हजारो भक्तांनी गर्दी करण्यास सुरु वात केली. मुंबईहून येणाऱ्या लोकलमधूनही हजारोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या पालख्याही शुक्रवारी खोपोलीत दाखल झाल्या.महाराजांचे उत्तराधिकारी आशिष महाराज, व्यवस्थापक शिवाजी पाटणकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आश्रमात अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केल्या होत्या. टेंभेस्वामी आश्रम, चिन्मय मिशन या ठिकाणीही गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बोरघाटात दरडी काढण्याचे काम सुरू असल्यामुळे, एक्स्प्रेस - वेची वाहतूक महामार्गावरून वळविल्याने भक्तांची काहीशी गैरसोय झाली. (वार्ताहर)नामस्मरण कार्यक्रमरेवदंडा : चौलमधील पर्वतवासी दत्तमंदिर येथे भक्त मंडळींनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परमार्थ निकेतनमध्ये भजन, नामस्मरण असे कार्यक्रम झाले. विविध विद्यालयांमध्ये अनेक शिष्यांनी गुरूंना वंदन केले. फुलांचा भाव गुरुपौर्णिमेमुळे वधारला होता. दत्तभक्तांनी फुलला मंदिर परिसरमुरुड : श्रीदत्त गुरूंचा साक्षात्कार झाल्यामुळे सुमारे २५० वर्षांपूर्वी स्वामी ब्रम्हेंद्र महाराज धावडशीकर यांनी मुरुड नगरीच्या उत्तरेस समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंच डोंगरावर श्री दत्त पादुकांची प्रतिष्ठापना केली. अशा हिरवाईने नटलेल्या रम्यस्थळी शुक्रवारी त्याच श्रद्धेने गेली १७-१८ वर्षांपासून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ट्रस्टींसह श्री दत्तभक्त करीत आहेत. दिगंबरा दिगंबरा हे अखंड नामस्मरण आदी धार्मिक कार्यक्र म झाले. सर.एस.ए हायस्कूलमुरूड येथे वक्तृत्व स्पर्धा मुरूड : भारतीय संस्कृतीत व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेची महती कथन करून विद्यार्थ्यांनी ती वक्तृत्वातून साकार केली. वक्तृत्व स्पर्धेत सर. एस. ए हायस्कूल मुरुड येथे इयत्ता ५ वी ते १२ वीच्या ३७ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धेत बाजी मारली ती सावित्रीच्या लेकींनी. श्रुती ठाकूर, सिद्धी विरकूड, स्रेहा गीते, संकेत तांबे, मृण्मयी भगत, प्रत्युष चौलकर, कोमल पाटील आदी विद्यार्थी विजयी झाले.स्वामी समर्थ मठात महाअभिषेकनेरळ : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मठामध्ये विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.मठामध्ये सकाळी अभिषेक तसेच महाअभिषेक करण्यात आली.त्यानंतर होमहवन होऊन सामुदायिक आरती झाली. सर्व भक्तांसाठी सामुदायिक महाअभिषेक करण्यात आला.